भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यावसायिकांपैकी एक असलेले मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी या कायमच चर्चेत असतात. नीता अंबानी या बिझनेसवूमन आहेत. नीता अंबानी या त्यांच्या रॉयल लूकमुळे चर्चेत असतात. सध्या नीता अंबानींच्या एका ड्रेसच्या किंमतीच चर्चा रंगताना दिसत आहे.
भारतीय कला आणि संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी उभारण्यात आलेले अत्याधुनिक असे ‘नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्र’ काही महिन्यांपूर्वी सुरु झाले. १ एप्रिल २०२३ पासून हे केंद्र प्रेक्षकांसाठी खुले करण्यात आले. या सांस्कृतिक केंद्रात ‘The Sound Of Music’ याचा प्रयोग पार पडला. या सांस्कृतिक केंद्रातील तो पहिला कार्यक्रम ठरला. या कार्यक्रमाला अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.
आणखी वाचा : “प्रेमाने जखम दिली तर…” उर्मिला कोठारेने दिलेलं थेट उत्तर
या कार्यक्रमासाठी नीता अंबानींच्या संपूर्ण कुटुंबाने हजेरी लावली. या कार्यक्रमावेळी नीता अंबानींनी सुंदर गाऊन परिधान केला होता. निळ्या रंगाचा फ्लोरल प्रिंट असलेल्या या गाऊनमध्ये त्या फारच सुंदर दिसत होत्या. यावेळी नीता अंबानींनी अत्यंत साधा लूक केला होता.
नीता अंबानींनी या फ्लोरल गाऊन बरोबरच कानात डायमंडचे इअररिंग्स आणि हातात डायमंड रिंग परिधान केली होती. या लूकमध्ये त्या फारच ग्लॅमरस दिसत होत्या.
नीता अंबानींनी परिधान केलेला हा गाऊन गुची या प्रसिद्ध कपड्याच्या ब्रँडमधील होता. या सिल्क गाऊनची किंमत ६ हजार २०० डॉलर इतकी आहे. भारतीय चलनानुसार या ड्रेसची किंमत ५ लाखांपेक्षा जास्त आहे. या ड्रेसचे अनेक फोटो आणि व्हिडीओही व्हायरल होताना दिसत आहेत.