मुंबईतील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरला एक वर्ष पूर्ण झालं आहे. या वर्षपूर्तीनिमित्त खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात मराठमोळ्या गायक संगीतकारांची जोडी अजय-अतुलने खास सादरीकरण केलं. तर नीता अंबानी यांनी नेसलेल्या पैठणीने लक्ष वेधून घेतलं.

वर्षपूर्तीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात नीता अंबानी यांच्या मराठमोळ्या लूकने उपस्थितांचं लक्ष वेधलं. त्यांनी हाताने विणलेली आकाशी रंगाची सुंदर महाराष्ट्रीय पैठणी या कार्यक्रमात नेसली होती. जरीचा काठ असलेल्या या पैठणीवर सुंदर फूलांची व मोरांची डिझाईन होती. कपाळावर चंद्रकोर, पैठणी आणि दागिने या लूकमध्ये नीता अंबानी सुंदर दिसत होत्या.

Aai Kuthe Kay Karte Fame Kaumudi Walokar Sangeet Ceremony
Video : “कौमुदी या अखंड ताऱ्यांच्या…”, फिल्मी स्टाइल प्रपोज, जबरदस्त डान्स अन्…; मराठी अभिनेत्रीचा ‘असा’ पार पडला संगीत सोहळा
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Titeeksha Tawde
Video: मालिका संपल्यानंतर कलाकार पुन्हा आले एकत्र; तितीक्षा तावडेने शेअर केला व्हिडीओ, नेटकरी म्हणाले…
Kaumudi Walokar Haldi Ceremony
हळद लागली! कौमुदी वलोकरच्या घरी पोहोचले ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील कलाकार, व्हिडीओ आला समोर…
Bigg Boss Marathi Season 5 Fame Jahnavi Killekar make reel video with son Ishan
Video: “सारी उमर चल दूँगी साथ तेरे…”, ‘बिग बॉस मराठी’नंतर जान्हवी किल्लेकरने पहिल्यांदाच लेकाबरोबर केला Reel व्हिडीओ, पाहा
Bigg Boss Marathi Season 5 Fame Akshay Kelkar will get married and share first vlog with future wife
Video: ‘बिग बॉस मराठी’ विजेता लवकरच चढणार बोहल्यावर, आनंदाची बातमी देत सांगितली लव्हस्टोरी
Aishwarya Narkar
मालिका संपल्यानंतर कोकणात पोहोचल्या ऐश्वर्या नारकर, चुलीवर केला स्वयंपाक; व्हिडीओ शेअर करत म्हणाल्या..
Bigg Boss Fame Marathi Actor Pushpa Style Dance
‘पुष्पा २’च्या ‘पीलिंग्स’ गाण्यावर मराठी अभिनेत्याचा जबरदस्त डान्स! सोबतीला आहे ‘ही’ अभिनेत्री, नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस

प्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी करतेय अरेंज मॅरेज, नवी मुंबईचा आहे होणारा पती; म्हणाली, “माझ्या आयुष्यात…”

“आपल्या देशाचे आणि संस्कृतीचे नाव संपूर्ण जगात उज्वल व्हावे, हा आमचा प्रयत्न आहे. तुम्ही आहात म्हणूनच या सर्व कला जिवंत आहेत, तुम्ही आहात म्हणून भारतीय संस्कृतीचा वारसा जिवंत आहे,आणि तुम्ही आहात म्हणूनच नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर आहे,” असं नीता अंबानी या कार्यक्रमात प्रेक्षकांना मराठीत म्हणाल्या.

पुरस्कार विजेती जोडी अजय-अतुल यांनी द ग्रँड थिएटरमध्ये इनडोअर लाइव्ह ऑर्केस्ट्राबरोबर त्यांची अप्रतिम गाणी सादर केली. अगदी ‘देवा श्री गणेशा’ सारख्या भक्ती गीतापासून ते ‘झिंगाट’ सारखी अनेक सुपरहिट गाणी त्यांनी गायली आणि उपस्थितांचं मनोरंजन केलं. “हे दोघे भाऊ संगीत वेडाने झपाटलेले आहेत, मी त्यांच्याबरोबर काम केलं आहे म्हणून मला माहित आहे की ते केवळ चांगले कलाकारच नाही तर खूप चांगले व्यक्तीही आहेत,” असं नीता अंबानी अजय अतुलबद्दल म्हणाल्या.

Story img Loader