भारताचे सगळ्यात श्रींमत उद्योगपती म्हणून ओळखले जाणारे मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी नेहमीच चर्चेत असतात. नीता अंबानी बिझनेस वूमन आहेत. त्यांच्या साड्या आणि दागिन्यांची नेहमीच चर्चा होते. नीता अंबानी आपल्या कुटुंबासह ‘अँटिलिया’ हाऊसमध्ये राहतात. ‘अँटिलिया’ आतून कसे दिसत असेल हे जाणून घेण्यासाठी लोक नेहमीच उत्सुक असतात. दरम्यान ‘अँटिलिया’ मधील नीता अंबानींच्या मेकअप रुमचा व्हिडीओ समोर आला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- … अन् एका रात्री सोहेल खानबरोबर पळून गेली होती सीमा सजदेह; म्हणाली, “त्याच्या सभोवताली अनेक सुंदर स्त्रिया…”

मेकअप आर्टिस्ट मिकी कॉन्ट्रैक्टने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नीता अंबानींचा एक व्हिडीओ शेअऱ केला आहे. व्हिडीओमध्ये ‘अँटिलिया’तील कर्माचारी नीता अंबानींचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहे. नीता अंबानींच्या मेकअप रुममध्ये हा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. यावेळी नीता अंबानींची होणारी सून राधिका मर्चेंटही उपस्थित होती.

व्हिडीओच्या माध्यमातून नीता अंबानींच्या मेकअप रुमची झलक समोर आली आहे. नीता अंबानींच्या रुममध्ये एक मोठा आरसा लावण्यात आला आहे. आरश्यासमोर मेकअपचे सामान ठेवण्यात आले आहे. ज्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे अत्तर, लिपस्टिक आणि पावडरचे शेड्स ठेवलेले दिसत आहेत. तर एका बाजूला हॅंगरला कपडे लावलेले दिसत आहेत.