दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण काही दिवसांपूर्वीच बाबा झाला आहे. राम चरणीची पत्नी उपासना कमिनेनी २० जूनला एका गोंडस मुलीला जन्म दिला. राम चरण आणि त्याच्या पत्नीला कन्यारत्न प्राप्त झाल्यावर सर्वत्र त्याच्यावर अभिनंदन असा वर्षाव होत आहे. आता अशातच मुकेश व नीता अंबानी यांनी राम चरणच्या लेकीसाठी एक खास भेट पाठवली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राम चरण बाबा झाल्यावर ‘आरआरआर’चे गायक काला भैरव यांनी राम चरणच्या मुलीसाठी एक खास धून तयार केली. तर याचबरोबर अनेकांकडून त्यांना भेटवस्तू मिळाल्या. आता व्यावसायिक मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी राम चरणच्या लेकीसाठी आशीर्वादरुपी एक अत्यंत महागडी भेट पाठवल्याचं समोर आलं आहे.

आणखी वाचा : मुकेश व नीता अंबानींनी लेकीच्या जुळ्या मुलांना दिली मोठी भेट, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क

मीडिया रिपोर्टनुसार, मुकेश अंबानी व नीता अंबानी यांनी राम चरणच्या लेकीसाठी सोन्याचा पाळणा भेट म्हणून दिला आहे. हा सोन्याचा पाळणा खूप महाग आहे. याची किंमत १ कोटी असल्याचं बोललं जात आहे. पण अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण अंबानींनी पाठवलेल्या या भेटीबद्दल कळल्यावर नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

हेही वाचा : अंबानींचा शाही थाट! कार्यक्रमाला उपस्थित सर्व पाहुण्यांना चांदीच्या ताटातून जेवण अन् मेन्यूही होता खास

दरम्यान, अभिनेता राम चरणच्या मुलीचं आज बारसं होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या घरी बारशाची जय्यत तयारी सुरू आहे. ती दोघं त्यांच्या लेकीचं नाव काय ठेवणार याची आता त्याच्या चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nita and mukesh ambani gifted ram charan daughter golden cradle rnv