दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण पत्नी उपासना कमिनेनीने २० जून रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्यांच्या लेकीचा नामकरण सोहळा गुरुवारी पार पडला. त्यांनी मुलीचं नाव ‘क्लिन कारा कोनिडेला’ असं ठेवलं आहे. राम चरणच्या लेकीला मुकेश अंबानींनी महागडी भेटवस्तू दिल्याची सोशल मीडियावर चर्चा होती, पण त्यांनी ती भेटवस्तू दिल्याची बातमी खोटी असल्याचं समोर आलं आहे.
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी राम चरणच्या लेकीसाठी आशीर्वादरुपी एक अत्यंत महागडी भेट पाठवल्याची माहिती समोर आली होती. मुकेश अंबानी व नीता अंबानी यांनी राम चरणच्या लेकीला सोन्याचा पाळणा भेट म्हणून दिला होता. सोन्याच्या पाळण्याची किंमत १ कोटी असल्याचं बोललं जात होतं, पण ही माहिती खोटी आहे.
अंबानी व राम चरणच्या कुटुंबातील जवळच्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, अशी कोणतीही भेटवस्तू देण्यात आलेली नाही. १ कोटी रुपयांचा सोन्याचा पाळणा भेट म्हणून दिल्याच्या वृत्तात कोणतीही सत्यता नाही.