अभिनेता निहार पांड्याची पत्नी आणि लोकप्रिय गायिका नीति मोहनने २ जूनला मुलाला जन्म दिला. सध्या ते दोघे पालकत्व एजॉय करत आहेत. नीति ही सोशल मीडियावर सक्रिय असते. तसंच इन्स्टाग्राम अकाऊंटवर मुलासोबतचे अनेक फोटो शेअर करत असते. मात्र या फोटोत कधी ही  तिने तिच्या मुलाचा चेहरा दाखवला नाही, आता नीतिने पहिल्यांदाच मुलाच्या चेहऱ्याची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. नीतिने इन्स्टाग्रामवर तीन फोटो शेअर केले असून यात निहारसुद्धा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नीतिने शेअर केलेल्या फोटोत निहार आणि नीति आपल्या बाळासोबत पोझ देत हसत आहेत. या फोटोत तिघांनी पारंपरिक गणवेश परिधान केला आहे. आर्यावीर नीति आणि निहारच्यामध्ये आहे आणि त्यांचे हे फोटो फारच गोड दिसत आहे.  त्यांच्या या छोट्याश्या कुटुंबाचे क्यूट फोटो शेअर केल्यानंतर चाहत्यांनी देखील फोटोला पसंती देताना दिसत आहेत. हे फोटो शेअर करत नीतिने कॅप्शन दिलं, “हा आहे आमचा जिगरचा तुकडा आर्यावीर , जेव्हा पासून हा आमच्या आयुष्यत आला आहे तेव्हा प्रत्येक दिवस जादू सारखा वाटतो. आर्यावीर जे काही करत आहे सकाळ असो किंवा रात्र प्रत्येक गोष्ट आमच्यासाठी ब्रेकिंग न्यूज आहे. त्याच्या येण्याने आमच्या घरात उत्साह आणि प्रेमचे वातावरण असून आम्ही धन्य झालो आहोत. आम्ही आमच्या मुलासाठी एक चांगले आई-वडील बनण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वादासाठी धन्यवाद.”

नीतिने शेअर केलेल्या या पोस्टवर नेटकरी लाइक्सचा वर्षाव करताना दिसले. तसंच कमेंट करत फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देताना दिसले. अनेक कलाकार देखील कमेंट करुन या छोट्याश्या कुटुंबाचे कौतुक करत आहेत. नीति मोहनची बहीण आणि बाळाची मावशी डान्सर मुक्ती मोहनने “हमारा बाप आया है आणि सोशल मीडिया डेब्यु पुरसकार जातो आर्यावीरला” अशी कमेंट केली आहे.

(Photo-Neeti Mohan Instagram)

मुलाच्या जन्मानंतर निहारने एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली होती. “माझ्या वडिलांनी जे मला शिवकलं ते माझ्या मुलाला शिवकण्याची संधी माझ्या पत्नीने मला दिली आहे. प्रत्येक दिवस माझ्या आयुष्यात आनंद पसरवत आहे.” असं म्हणत निहारने एक सुंदर पोस्ट शेअर केली होती.