Marathi Art Director Nitin Desai Commits Suicide : कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केल्याचं वृत्त समोर आलं अन् कित्येकांच्या पायाखालची जमीनच सरकली. हिंदी तसेच मराठी चित्रपटसृष्टीवर आपला ठसा उमटवणारा एक उमदा कलाकार गेल्याने संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. ‘१९४२ ए लव्ह स्टोरी’पासून ‘जोधा अकबर’, ‘लगान’, ‘देवदास, हम दिल दे चुके सनम’पर्यंत कित्येक सुपरहीट चित्रपटांसाठी त्यांनी कला दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं आहे.

रामोजी फिल्म सिटीइतकाच भव्य एन.डी स्टुडिओही त्यांनी कर्जतमध्ये उभारला होता. नितीन देसाई यांनी त्यांच्या याच स्टुडिओमध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे. अद्याप यामागील नेमकं कारण समोर आलेलं नाही. नितीन देसाई यांच्यावर बरीच कर्ज असल्याने त्यांनी हे पाऊल उचललं अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर होताना दिसत आहे. विविध स्तरातून लोक याबद्दल व्यक्त होत आहेत.

thane body found hanged week ago in Kalwa has finally been identified
दवाखान्यातील चिठ्ठीमुळे कुजलेल्या मृतदेहाची ओळख पटली, आठवड्याभरापूर्वी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता मृतदेह
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
thane body found hanged week ago in Kalwa has finally been identified
कर्जाला कंटाळून मनपा अधिकाऱ्याची आत्महत्या 
pets cats
पाळीव प्राण्यांच्या विरहाच्या भीतीने नैराश्य, तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
Maharani Laxmi Bai Medical College, in Jhansi district
Jhansi Hospital Fire : नर्सने काडीपेटी पेटवली अन्… १० अर्भकांचा जीव घेणाऱ्या झाशी रुग्णालयात आग कशी लागली?
bihar man murder Mumbai
मुंबई: हातावर गोंदवलेल्या प्रेयसीच्या नावामुळे लागला हत्येचा छडा, प्रेमप्रकरणावरून बिहारमधील तरुणाची मुंबईत हत्या
History Of Tipu Sultan
एका रात्रीत ८०० मंड्यम अय्यंगारांची हत्या; ‘नरक चतुर्दशी’ हा दिवस शोकदिवस का ठरला?

आणखी वाचा : अक्षय कुमारने वाहिली नितीन देसाईंना श्रद्धांजली; ‘ओह माय गॉड २’च्या ट्रेलरचं प्रदर्शनही केलं रद्द

नुकतंच नितीन यांच्या बॉडीगार्डने पोलिसांना याबद्दल माहिती दिली. या माहितीनुसार नितीन देसाई हे रात्री १० च्या दरम्यान आपल्या खोलीत गेले. सकाळी जेव्हा ते बराच वेळ आपल्या खोलीच्या बाहेर आले नाहीत तेव्हा त्यांच्या बॉडीगार्डने दरवाजा उघडायचा प्रयत्न केला. खिडकीतून जेव्हा पाहिलं तेव्हा त्यांना नितीन देसाई यांनी गळफास घेतल्याचं दिसलं, त्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली अन् नितीन यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

५८ व्या वर्षी नितीन देसाई यांनी केलेल्या आत्महत्येचा सगळ्यांनाच धक्का बसला आहे. नितीन देसाई यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं होतं. १९८७ सालापासून त्यांनी चित्रपटांसाठी कला दिग्दर्शनाचं काम सुरू केलं. एखाद्या चित्रपटाचं ‘लार्जर दॅन लाईफ’ असं चित्र उभं करण्यात नितीन देसाई यांचा सिंहाचा वाटा होता.