नितीन देसाई यांच्या निधनाचं वृत्त २ ऑगस्टच्या दिवशीच आलं. नितीन देसाई यांनी त्यांच्या कर्जत येथील एन. डी. स्टुडिओत गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर त्यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं. शवविच्छेदनानंतर त्यांचा मृतदेह कुटुंबियांना सोपवण्यात आला. नितीन देसाई यांच्या पार्थिवाला त्यांच्या मुलीने खांदा दिला. नितीन देसाई यांच्या पार्थिवाला खांदा देत असणाऱ्या त्यांच्या मुलीला पाहून उपस्थितांनाही अश्रू अनावर झाले.
सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी कर्जतमधील त्यांच्या एन. डी. स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या या आत्महत्येमुळे मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. नितीन देसाई यांनी आत्महत्येपूर्वी काही व्हॉईस नोट रेकॉर्ड केल्याची माहिती समोर आली आहे. ज्या एन. डी. स्टुडिओमध्ये देसाई यांनी आत्महत्या केली त्याच स्टुडिओमध्ये त्यांचं पार्थिव आज अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं.
नितीन देसाई यांनी ‘१९४२ ए लव्ह स्टोरी’पासून ‘जोधा अकबर’, ‘लगान’, ‘देवदास, हम दिल दे चुके सनम’पर्यंत कित्येक मराठी आणि हिंदी चित्रपटांसाठी कला दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. भविष्यात अनेक प्रोजक्टवर त्यांना काम करायचं होतं. मात्र, आत्महत्येसारख टोकाचं पाऊल उचलल्यामुळे नितीन देसाई यांची ती स्वप्नं अपूर्णच राहिली.
कला दिग्दर्शक नितीन देसाई यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं समोर आलं होतं. त्यांनी आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलण्यामागे हेच कारण असल्याचं ही सांगितलं जात आहे. नितीन देसाई यांच्या एन. डी. स्टुडिओवर तब्बल २४९ कोटींचं कर्ज असल्याची बाब आता समोर आली आहे. त्यांच्या स्टुडिओवर जप्तीची कारवाईही प्रलंबित होती.