अभिनेत्री निवेदिता सराफ या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. निवेदिता या सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत त्या चाहत्यांच्या संपर्कात राहतात. नुकतीच निवेदिता यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत त्यांनी एका आईला कोणती गोष्ट करताना वाईट वाटतं या विषयी सांगितले आहे.
आणखी वाचा : Raj Thackeray Birthday : वयाचे अंतर ते बाळासाहेबांच्या मित्राची मुलगी, अशी आहे राज आणि शर्मिला ठाकरे यांनी ‘लव्ह स्टोरी’
निवेदिता यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. यावेळी त्यांनी पती अशोक सराफ आणि मुलगा अनिकेत सराफ यांच्यासोबत हा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत जगात सगळ्यात अवघड गोष्ट ही मुलांना बाय म्हणणं आहे. सध्या त्यांनी शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
आणखी वाचा : “डोनाल्ड ट्रम्प हे तर आमचे तात्या…”, अभिजीत बिचुकलेचे वक्तव्य चर्चेत
आणखी वाचा : “नवऱ्यासाठी निर्जळी उपवास करण्यापेक्षा…”, वट पोर्णिमेच्या निमित्ताने हेमांगी कवीने शेअर केली खास पोस्ट
निवेदिता आणि अशोक सराफ यांचा मुलगा अनिकेत सराफ हा एक शेफ आहे. तो सध्या परदेशात आहे. अशोक सराफ यांच्या वाढदिवासानिमित्त तो भारतात आला होता. वाढदिवस झाल्यानंतर तो परत परदेशात निघाला असताना निवेदित आणि अशोक सराफ त्याला विमानतळावर सोडायला गेल्याचा हा फोटो आहे.