‘कामेडी नाईट्स विथ कपिल’ कार्यक्रमामुळे घराघरांत पोहोचलेला अभिनेता कपिल शर्मा याने ‘कलर्स’ वाहिनीने आपला कार्यक्रम बंद केल्याबद्दल आपल्याला वाहिनीविरुद्ध किंवा तिच्या अधिकाऱ्यांविरुद्ध कसलाही राग नसल्याचे म्हटले आहे. कपिल लवकरच ‘द कपिल शर्मा शो’ घेऊन येतो आहे. सोनी वाहिनीवर येत्या २३ एप्रिलला या कार्यक्रमाचा पहिला भाग प्रसारित होणार आहे. पहिल्या भागामध्ये पाहुणा म्हणून शाहरूख खान असणार आहे.
‘कामेडी नाईट्स विथ कपिल’ या कार्यक्रमामुळेच कपिल शर्मा देशात प्रसिद्धीच्या झोतात आला. त्याचे स्वतःचे चाहते तयार झाले. पण काही महिन्यांपूर्वी कलर्स वाहिनीने हा कार्यक्रम बंद करून त्याजागी ‘कॉमेडी नाईट्स लाईव्ह’ हा कार्यक्रम आणला. विशेष म्हणजे कामेडी नाईट्स विथ कपिल या कार्यक्रमाचा शेवटचा भागही वाहिनीने प्रसारित केला नव्हता. कोणत्या कारणांमुळे हा कार्यक्रम कलर्स वाहिनीने बंद केला, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. पण या कार्यक्रमामुळे कपिल शर्माला मिळालेल्या लोकप्रियतेमुळे तो आता सोनी वाहिनीवरून नवीन कार्यक्रम घेऊन येतो आहे.
आपल्याला वाहिनीबद्दल किंवा तिच्या अधिकाऱ्यांबद्दल काही बोलायचे नाही. मला कोणाबद्दल रागही नाही. ते अत्यंत व्यावसायिक लोक आहेत. त्यांना त्यांची वाहिनी चालवायची आहे. आम्ही त्यांच्यासोबत काम करत होतो, तोपर्यंत सगळं काही ठिक होतं. पण आता आम्ही दुसऱ्या वाहिनीबरोबर काम करतो आहोत, असे कपिल शर्माने सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No hard feelings with colors channel kapil sharma