गेल्यावर्षी बॉक्स ऑफीसवर पाठोपाठ दोन हिट चित्रपट देणा-या विद्या बालनची हॅट्रिक चुकली आहे. मागील आठवड्यात प्रदर्शित झालेला ‘घनचक्कर’ या विनोदी चित्रपटाने चक्कर खाल्ली असून बॉक्स ऑफीसवर कमाल करण्यास  चित्रपटास अपयश आले.
‘नो वन किल जेसिका’ चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार गुप्ता यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात विद्या आणि इमरान प्रेक्षकांवर जादू चालविण्यास असफल राहिले आहेत. चित्रपटाने सुरुवातींच्या दिवसांमध्ये केवळ २० कोटींचा गल्ला जमावला आहे. समीक्षकांचे घनचक्करबाबत खास मत नसून चित्रपट अधिक मजेशीर होऊ शकला असता असे त्यांचे म्हणणे आहे.
‘घनचक्कर’ला सध्या धनुष आणि सोनम कपूर यांचा ‘रांझना’ चित्रपट चांगलेच आव्हान देत आहे. या चित्रपटाने दुस-या आठवड्यात १०.७० कोटींचा निव्वळ नफा कमविला आहे.

Story img Loader