सध्या बॉलीवूडमध्ये चर्चा आहे ती बिपाशा बसू आणि करण ग्रोव्हर यांच्या लग्नाची. या दोघांनी गुरुवारी आपल्या लग्नाची घोषणा केली असून, करणने बिपाशाला आपल्या प्रेमाची पावती म्हणून अंगठीही दिली.
बिपाशा आणि करणच्या लग्नासंबंधीच्या घडामोडींबद्दलची माहिती आपल्याला वेळोवेळी कळतचं राहिल. यासंबंधीचे नुकतेच एक वृत्त समोर आले असून , त्यानुसार बिपाशाचा पूर्वाश्रमीचा प्रियकर जॉन अब्राहम याला निमंत्रितांच्या यादीतून वगळ्ल्याचे कळते. तसेच, स्पॉटबॉय संकेतस्थळाच्या वृत्तानुसार बिपाशाचे वेडिंग प्लॅनिंग चक्क दिनो मोरियाची प्रेयसी नंदिता महतानी करणार असल्याचे कळते. जॉनआधी बिपाशाचे दिनो मोरियाशी प्रेमसंबंध होते.
फॅशन डिझायनर असलेली नंदिता ही बिपाशाच्या लग्नातील प्रत्येक गोष्टीकडे जातीने लक्ष देत आहे. बिपाशा आणि करणचे ३० एप्रिलला लग्न होईल. त्यासाठी निमंत्रित करण्यात येणा-या व्यक्तीपासून ते जेवणाच्या पदार्थांपर्यंत नंदिता बारीक लक्ष देत आहे.

Story img Loader