विराट-अनुष्का सध्या कोणाचीही तमा न बाळगता सिडनीमध्ये एकत्र फिरताना दिसत आहेत. चौथ्या आणि अखेरच्या कसोटीसाठी भारतीय संघ सिडनीमध्ये दाखल झाला आहे. भारतीय संघाने सरावानंतर सिडनी शहरातील डार्लिंग हार्बर या ठिकाणाला भेट दिली. यावेळी कर्णधार विराट कोहलीची प्रेयसी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माही भारतीय संघासोबत होती. त्यामुळे विराट-अनुष्काचा ‘प्यार करेंगे खुल्लम खुल्ला’चा अंदाज पुन्हा एकदा दिसून आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा


ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील विराटची दृष्ट लागण्यासारखी झालेली कामगिरी आणि अनुष्काची भूमिका असलेला ‘पीके’ चित्रपट सध्या प्रचंड गाजत असल्यामुळे दोघेही सध्या खुशीत आहे. गेल्या वर्षभरापासून विराट आणि अनुष्काच्या प्रेमाचा लपंडाव सुरू होता. मात्र, काही दिवसांपूर्वी दोघांनीही प्रसारमाध्यमांसमोर आपल्या नात्याची कबुली दिली होती. त्यानंतर विराट-अनुष्काची जोडी वेगवेगळ्या कारणांमुळे सतत चर्चेत आहे. 
  

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No more hide n seek for virat and anushka couple enjoy day out in sydney