बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूला दीड वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या त्याच्या घरात सुशांतचा मृतदेह आढळून आला होता. सुशांत सिंहच्या मृत्यूला इतका काळ उलटला असला तरी अद्याप त्याचे चाहते त्याला न्याय देण्याची मागणी करत आहेत. तर दुसरीकडे लवकरच सुशांत सिंहच्या जीवनावर बायोपिकची निर्मिती केली जाणार असल्याचे बोललं जात आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर सुशांत सिंह राजपूतची बहिण प्रियांकाने एक पोस्ट शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुशांत सिंहची बहिण प्रियांका ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. नुकतंच तिने तिचा आणि सुशांतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला तिने हटके कॅप्शन दिले आहे. “माझा ठाम विश्वास आहे की जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत SSR (सुशांत सिंह राजपूत) वर कोणताही चित्रपट बनवू नये. हे माझे भाऊ आणि कलाकार सुशांत सिंह राजपूतला वचन आहे.” असे प्रियांकाने या पोस्टमध्ये लिहिले आहे.

दुसरं म्हणजे कोणत्याही कलाकारामध्ये सुशांत सिंहचे सुंदर, निरागस आणि प्रगतशील व्यक्तिमत्त्व पडद्यावर दाखवण्याची क्षमता नाही. याचे मला आश्चर्य वाटते!!! तसेच सुशांतच्या अनोख्या कथेचे सत्य पडद्यावर उतरवण्याची ताकद या चित्रपटसृष्टीतील कोणाकडे आहे, अशी अपेक्षा करणेही चुकीचे ठरेल. सुशांतची कहाणी सांगण्याचे धाडस कोणामध्येही नाही. त्याने नेहमी स्वत:च्या मनाचे ऐकले आहे. जे प्रभावशाली आणि घराणेशाही निर्मिती हाऊस आहे त्यांना त्यांच्या अटींवर सोडून दिले, असेही ती म्हणाली.

तसेच सुशांतला त्याच्या बायोपिकमध्ये स्वत:ला अभिनय करायचा आहे. त्यामुळे जर भविष्यात त्याचा बायोपिक बनवला गेला तर तंत्रज्ञानाच्या मदतीने ही इच्छा पूर्ण व्हावी. भविष्यात तंत्रज्ञानाच्या मदतीने हे घडू शकते, असेही तिने सांगितले.

क्रिती सेननने सुशांत सिंहबद्दल केला खुलासा, म्हणाली “त्या रात्री आम्ही वाईनची बाटली घेऊन…”

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने १४ जून २०२० रोजी आत्महत्या केली होती. मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या घरात त्याचा मृतदेह आढळून आला होता. त्याने आत्महत्या केली असल्याचं मुंबई पोलिसांनी म्हटलं होतं. त्याच्या आत्महत्येनं बॉलिवडूच नव्हे, तर सगळेच हादरले होते. त्याच्या चाहत्यांसाठीही हा मोठा धक्का होता. मात्र, त्यानंतर वेगवेगळे युक्तीवाद केले गेले. तसेच त्यांची हत्या करण्यात आल्याचंही म्हटलं गेलं. त्याच्या कुटुंबियांनीही या प्रकरणात दाखल केली. त्याच्या मृत्यूचं प्रकरण तापल्यानंतर हा तपास सीबीआयकडे देण्यात आला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No movie on sushant singh rajput should be made until justice is served says ssr sister nrp