हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक प्रकाश झा यांनी थेट सेन्सॉर बोर्डाच्या गरजेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आजच्या काळात सेन्सॉर बोर्डाची गरजच नाही, असे स्पष्ट मत त्यांनी मांडले आहे. प्रकाश झा यांचे दिग्दर्शन असलेला ‘जय गंगाजल’ हा चित्रपट सध्या सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात सापडला आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे मत मांडले.
ते म्हणाले, सेन्सॉर बोर्डाची मागणी आम्ही कधीच केली नव्हती आणि त्याची खरंतर गरजच नाही. आम्ही चित्रपटाची निर्मिती करतानाच त्यात काय दाखवायला नको, हे ठरवू शकतो. कोणीतरी आमच्या डोक्यावर बसून ते आम्हाला सांगण्याची गरज नाही.
सेन्सॉर बोर्डाचे सध्याचे प्रमुख पहलाज निहलानी यांच्यावरही प्रकाश झा यांनी आरोप केले. निहलानी बोर्डाच्या माध्यमातून स्वतःचा अजेंडा राबवत आहेत, अशी टीका त्यांनी केली. चित्रपटांतील भाषा आणि कथेची गरज याबाबतचे त्यांचे आकलन कमी असल्याचा आरोप प्रकाश झा यांनी केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा