बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानने आपल्या मुलीने चित्रपटसृष्टीत काम करण्यावर कोणतीच हरकत नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, त्यापूर्वी तिने आपले शिक्षण पूर्ण करावे, अशी इच्छाही त्याने व्यक्त केली. १९९१ साली सैफने अभिनेत्री अमृता सिंग हिच्याशी विवाह केला. तिच्यापासून त्याला मुलगी सारा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. तेरा वर्षांच्या लग्नानंतर २००४ साली अमृता आणि सैफ हे वेगळे झाले. त्यानंतर आता सैफने करिनाशी विवाह केला आहे.
सैफची मुलगी सारा हिला आतापासूनच चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या आहेत. “सारा आता अमेरिकेतील कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये शिकत आहे. डिग्री मिळाली की, ती हवं ते करण्यासाठी मोकळी आहे. जगभरात तिने कुठेही काम करावे किंवा भारतात परतून चित्रपटसृष्टीत यावे,” असे सैफ म्हणाला. जर साराला अभिनेत्री बनण्याची इच्छा असेल तर माझा तिला पूर्ण पाठींबा आहे. मात्र, यासाठी तिला थोड वजन कमी करण्याची गरज असल्याचेही सैफ म्हणाला. चिपटसृष्टीत येण्याकरिता तिला वजन कमी करावे लागेल.
सारा ही सैफची मैत्रीण आणि त्याची कमजोरीदेखील आहे.

Story img Loader