माझ्या वडिलांची अनोखी शैली असून, कोणीही तिचे अनुकरण करू शकत नसल्येचे मिथुन चक्रवर्तीचा मुलगा मिमोहचे म्हणणे आहे. तो म्हणतो, त्यांची स्वत:ची विशिष्ट अशी शैली आहे. ते जे काही करतात ती तरुणवर्गाची स्टाईल बनते. मिमोहने (महाक्षय) ‘जिमी’ चित्रपटात काम केले होते. ‘किंगफीशर अल्ट्रा बंगाल फॅशन वीक’मध्ये मिमोहने ‘रॅम्प-वॉक’ केले. पहिल्यांदाच ‘रॅम्प-वॉक’ करत असलेला मिमोह आपल्या वडिलांच्या स्टाईलविषयी भरभरून बोलला. रॅम्पवरचा आपला अनुभव कथन करताना तो म्हणाला, मी खूप चिंतेत होतो, परंतु मी स्वत:ला शांत ठेवण्याचा प्रयत्न केला. रॅम्प-वॉकपेक्षा कॅमेऱ्यासमोर अभिनय करणे कठीण असल्याचे मत त्याने व्यक्त केले. अभिनय करणे फार कठीण काम आहे. तुम्हाला प्रेक्षकांना २ तास खिळवून ठेवावे लागते, परंतु रॅम्पवर सर्व काही ६० सेकंदात उरकत असल्याचे देखील तो म्हणाला. शहरी तरूण आणि उत्सवाची थीम असलेल्या मनोविराज खोसलाच्या शोसाठी त्याने शो-स्टॉपर म्हणून रॅम्पवर वॉक केले. चांगल्या प्रकारच्या फॅशनमुळे आत्मविश्वास मिळत असल्याचे त्याचे मानणे आहे.
माझ्या वडिलांचे कोणीही अनुकरण करू शकत नाही – मिमोह चक्रवर्ती
माझ्या वडिलांची अनोखी शैली असून, कोणीही तिचे अनुकरण करू शकत नसल्येचे मिथुन चक्रवर्तीचा मुलगा मिमोहचे म्हणणे आहे.
First published on: 25-02-2014 at 03:03 IST
TOPICSबॉलिवूडBollywoodमनोरंजन बातम्याEntertainment Newsहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी मूव्हीHindi Movieहिंदी सिनेमाHindi Cinema
+ 1 More
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No one can copy my dad says mithun chakrabortys son mahaakshay