सिनेइतिहासात गाजलेल्या मदर इंडिया सिनेमातील अभिनेत्री नरगीसच्या भूमिकेसारखे फोटो शूट अभिनेत्री विद्या बालनसोबत करण्यात आले. या “सिने ब्लिट्ज” पोस्टर अनावरणावेळी मदर इंडिया या उत्कृष्ट चित्रपटाचा रिमेक करण्याचे धाडस कोणी करू शकत नाही असे विद्या बालनले म्हटले. भारतीय सिनेसृष्टीने शंभरी गाठल्याच्या पार्श्वभूमीवर विद्याने “सिने ब्लिट्ज”साठी मदर इंडिया चित्रपटातील अभिनेत्री नरगीसच्या पोस्टर्ससारखे फोटो शूट केले. यावेळी विद्या म्हणाली की, “मदर इंडिया या चित्रपटाचे रिमेक करण्याचे धाडस कोणी करु शकेल असे वाटत नाही. ती उंची गाठणे शक्य नाही आणि जो या उत्कृष्ट चित्रपटाचे रिमेक करेल त्याला माझा सलाम असेल” तसेच “जेव्हा आपण भारतीय सिनेजगतात एका मजबूत स्त्री चा विचार करतो तेव्हा आपल्या विचारात मदर इंडिया चित्रपटातील नरगीसजींचे नाव पुढे येते. मला या चित्रपटाची प्रशंसा करायला मिळते आहे हीच माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे.”
तसेच राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित झालेली अभिनेत्री विद्या बालनने भविष्यात ‘मिस्टर इंडिया’ आणि ‘सदमा’ चित्रपटातील श्रीदेवी, ‘खूबसूरत’ आणि ‘उमराव जान’ चित्रपटातील रेखा. तसेच ‘सीता और गीता’ चित्रपटातील हेमा मालिनी यांच्यासारख्या भूमिका साकारण्याची इच्छा असल्याचेही विद्या बालनने स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा