‘सावरिया’ पासून कालच्या ‘यह जवानी है दिवानी’ पर्यंत रणबीर कपूरला आपण पडद्यावर वेगवेगळ्या चित्रपट तारकांसोबत रोमान्स करताना पाहीले आहे. पण, त्याच्या आगामी चित्रपटांपैकी एक ‘रॉय’मध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचा रोमान्स न करणारा रणबीर दिसणार आहे.
‘रॉय’मध्ये रणबीर सोबत अर्जुन रामपाल आणि जॅक्लिन फर्नांडिस यांच्या देखील महत्वाच्या भूमिका आहेत. जॅक्लिनची या चित्रपटात दुहेरी भूमिका साकारणार आहे. मात्र, रणबीरला रोमान्ससाठी या चित्रपटातील व्यक्तीरेखेमध्ये वाव नाही. तो जवळजवळ संपूर्ण चित्रपटात एकटा आहे, परंतू शेवटी कथेला कलाटणी देण्यात आली आहे.
रणबीर या चित्रपटात पोलिसांच्या मदतीने एक रहस्य उलगडताना आपल्याला दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती टी-सिरिजची असून, विक्की सिंग दिग्दर्शक आहेत. या चित्रपटाचे चित्रिकरण लंडन, व्हिएतनाम व मुंबई या ठिकाणी होणार आहे. या वर्षी दिवाळीत ‘रॉय’ आपल्या भेटीला येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा