परिणीती चोप्रा चित्रीकरणाच्या कामात इतकी व्यस्त आहे की, तिला वास्तविक जीवनात प्रेमासाठी वेळच नाही. परिणीती ‘हॅंसी तो फसी’, ‘किल दिल’, ‘शुद्ध देसी रोमान्स’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. याव्यतिरीक्त ती ‘इशकजादे’ चित्रपटाचा दिग्दर्शक फैसल याच्या आगामी चित्रपटातही असणार आहे.
परिणीतीचे नाव उदय चोप्रा, जॅकी भगनानी, दिग्दर्शक मनीष शर्मा आणि अर्जुन कपूर यांच्याशी जोडले जात आहे. मात्र, आपण कामात इतके व्यस्त आहोत की यासारख्या अफवांवर चिंता करण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही, असे परिणीतीचे म्हणणे आहे. परिणीती म्हणाली, मी बॅंकॉकमध्ये शूटिंग करत आहे आणि ती पूर्ण झाल्यावर लगेचच दुस-या चित्रपटाच्या शूटिंग करता मुंबईला रवाना होणार आहे. कोणाशी संबंध तर सोडूनच द्या पण मला जेवयालाही वेळ नाही. पण, मी खूश आहे.

Story img Loader