नुकतंच इल्युमिन्टी फिल्म्सचा फायडिंग फॅनी चित्रपटाचा प्रिमियर टोरोन्टो फिल्म फेस्टीवलमध्ये होणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, दिग्दर्शक होमी अदाजानियाने या बातमीस नाकारले आहे.
याबद्दल बोलताना होमी म्हणाले की, ही बातमी खरी असायला हवी होती अशी माझीही इच्छा होती. पण, फॅनीचे एडिट झालेले नाही. एडिटिंग झाल्यावर आम्ही त्याबाबत नक्कीच कळवू कारण टोरन्टो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा चित्रपटाच्या प्रिमियरसाठी मोठा मंच असेल. हा चित्रपट इंग्रजीत तयार करण्यात आलेला असून याचे शूटींग गोव्यात झाले आहे. पण, भारतीय प्रेक्षकांसाठी फॅनीचे हिंदी व्हर्जनही तयार करण्यात आले आहे.
फायडिंग फॅनीमध्ये अंजली पाटील, दीपिका पादुकोण, अर्जुन कपूर, पंकज कपूर, नसिरुद्दीन शाह आणि डिंपल कपाडिया यांच्या भूमिका आहेत.

Story img Loader