मुंबई : बिबिर नावाचा चिमुकला गावकुसाबाहेर राहणाऱ्या म्हातारीला मदत करून गावात अर्थव्यवस्था उभारतो… शिकण्याचा कंटाळा करणाऱ्या निलूला आणि तिच्या मित्र-मैत्रिणींना अचानक शाळा आवडू लागते… साथीच्या रोगाने आजारी झालेल्या अफियाला आणि तिच्या पालकांना गावातील रुग्णालयात उपचार घेण्याचे महत्त्व कळते… या आणि यांसारख्या चित्रगोष्टींमधून लहान मुलांमध्ये सामाजिक बदलांची जाणीव करून देणारे चित्रग्रंथ नोबेल विजेत्या एस्थर दुफ्लो यांनी लिहिले असून या आठवड्यात मराठीसह पाच भाषांत प्रकाशित झाले.

दुफ्लो या अर्थतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या. २०१९ साली त्यांना, त्यांचे पती डॉ. अभिजीत बॅनर्जी यांच्यासह प्राध्यापक मायकेल क्रेमर यांना अर्थशास्त्रासाठी नोबेल पारितोषिक मिळाले. त्यांनी फ्रेंच भाषेमध्ये लिहिलेल्या चित्रग्रंथांचा मराठीसह हिंदी, कन्नड, बंगाली आणि तमीळ या पाच भाषांत अनुवाद प्रथम बुक्सने साकारला असून या आठवड्यात दुफ्लो यांच्या या पुस्तकांचे प्रकाशन भारतातील विविध शहरांत झाले.

Ratan Tata signed letter, Ratan Tata,
रतन टाटा यांच्या स्वहस्ताक्षरातील पत्र व्हायरल….
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Loksatta lokrang engrossing mystery tale
गुंतवणारी गूढरम्य आदिकथा…
ratan tata
द कम्प्लीट मॅन…
manvat murders web series review by loksatta reshma raikwar
Manvat Murders Review : उत्कंठावर्धक थरारनाट्य
Nalasopara, girl was raped Nalasopara,
वसई : नालासोपार्‍यात १३ वर्षीय मुलीवर बलात्कार, अश्लील छायाचित्राआधारे उकळली २५ हजारांची खंडणी
Phulvanti Marathi movie based on the novel
कादंबरीवर आधारित ‘फुलवंती’
Ankhi ek Mohenjo Daro Documentary Review
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : दृश्यसंस्कृती प्रसाराचा प्रवास…

हेही वाचा >>> दिलीप प्रभावळकरांची खास पत्राची आठवण; ‘पत्रा पत्री’ अभिवाचनाचे जोरदार प्रयोग

एस्थर फ्रेंच भाषेतील लिखाण

एस्थर यांनी फ्रेंच भाषेत लिहिलेल्या पाच पुस्तकांच्या चित्र-शब्दग्रंथात लहान मुलांना आवडतील अशा गोष्टी आहेत. छोट्याशा उपक्रमांतून होणारा सामाजिक, आर्थिक ‘बदल’ यांचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष शिक्षण देणाऱ्या या गोष्टी आहेत. लेखिका आणि चित्रकार या पुस्तकांच्या प्रकाशनासाठी गेले काही दिवस भारतात होत्या. ‘फ्रेंच इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ आणि आलियान्स फ्रॉन्से, लिवर फाऊंडेशनतर्फे यानिमित्ताने कोलकाता, दिल्ली आणि बेंगळूरु येेथे त्यांचे कार्यक्रम झाले.

पुस्तकांत काय?

शायेन ऑलिव्हिए यांनी चित्रबद्ध केलेल्या या पाच ग्रंथांमध्ये वय वर्षे आठ ते १२ या वयोगटांतील मुलांसाठी दुफ्लो यांनी गोष्टी लिहिल्या आहेत. त्याचा मराठी अनुवाद मुकुंद टाकसाळे आणि माधव चव्हाण यांनी केला आहे. साऱ्या गोष्टी समांतर काळातील घटनांमधून मुलांना अर्थकारण, आरोग्य, शिक्षण आणि समाजकारण यांच्याविषयीची जाणीव करून देणाऱ्या आहेत.

लहान मुलांच्या कलाने त्यांना सामाजिक बदलांची जाणीव करून देण्यासाठी या पुस्तकांची निर्मिती करण्यात आली आहे. या गोष्टी आणि त्यातील चित्रे मुलांना आवडतील अशा रंजक पद्धतीने चितारण्यात आली आहेत. संध्या टाकसाळे, वरिष्ठ संपादक, प्रथम बुक्स

भारतातील मुलांपर्यंत माझी पुस्तके पोहोचविण्यासाठी ‘प्रथम बुक्स’ने घेतलेला पुढाकार हा मी माझा गौरव समजते. एस्थर दुफ्लो, नोबेल विजेत्या अर्थतज्ज्ञ.