आठवड्यापूर्वी बॉलिवूडस्टार हृतिक रोशन याच्याशी असलेले सतरा वर्षांचे नाते पत्नी सुझानने संपवले. त्यानंतर त्यांच्या विभक्त होण्यामागील कारणे समोर येऊ लागली. हृतिक व सुझान यांच्या विभक्त होण्यामागे वेगवेगळी नावे जोडली गेली. मात्र, काल बुधवारी पत्रकारांनी सुझानला गाठून तीच्यावर प्रश्नांचा भडीमार केला असता, त्यांच्या विभक्त होण्यास कुणीही जबाबदार नसल्याचे सुझान म्हणाली.    
“आमच्या विभक्त होण्यास कुणाला जबाबदार धरणे यावेळी योग्य नाही. हा आमच्या दोघांमधील खासगी मुद्दा आहे. इतरांनी त्यात जास्त रस घेऊ नये,” असे सुझान म्हणाली.
सुझान आणि अर्जून रामपाल यांच्यातील मैत्रीमुळे हृतिक आणि सुझान यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला असल्याच्या चर्चेने चित्रपटसृष्टीमध्ये जोर धरला आहे.

Story img Loader