चित्रपट, नाटक, दूरचित्रवाहिन्यांवरील मालिका, वृत्तवाहिन्या आदींसाठी संस्कृती कलादर्पण संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या संस्कृती कलादर्पण पुरस्कारांची नामांकने जाहीर झाली आहेत. ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता तळवलकर यांना कलागौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. कलादर्पण पुरस्कार वितरण १० मे रोजी मुंबईत एका विशेष कार्यक्रमात केले जाणार आहे.
चित्रपट विभागासाठी मंगेश कुलकर्णी, कांचन अधिकारी, विजय पाटकर यांनी; तर नाटक विभागासाठी अशोक पाटोळे, अजित केळकर, आसावरी जोशी आणि दूरचित्रवाहिनी विभागासाठी रेखा सहाय, स्मिता जयकर, नीलकांती पाटेकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
जाहीर झालेली नामांकने पुढीलप्रमाणे-
सवरेत्कृष्ट दिग्दर्शक- समीर विद्वांस (छापा काटा), अजित भुरे (अलिबाबा आणि चाळीस चोर), कुमार सोहोनी (जन्मरहस्य). सवरेत्कृष्ट अभिनेता- सुशील इनामदार (डेथ ऑफ ए काँकर), चिन्मय मांडलेकर (मि. अॅण्ड मिसेस), मोहन जोशी (थोडंसं लॉजिक थोडंसं मॅजिक), स्वप्निल जोशी (गेट वेल सून), अरुण होर्णेकर (राशोमान). सवरेत्कृष्ट अत्रिनेत्री- रिमा (एकदा पाहावं करून), मधुरा वेलणकर-साटम (मि. अॅण्ड मिसेस), पर्ण पेठे (आषाढातील एक दिवस), अमिता खोपकर (जन्मरहस्य), मुक्ता बर्वे (छापा काटा).
नाटक विभागात याबरोबरच लेखक, विनोदी अभिनेता, विनोदी अभिनेत्री, साहाय्यक अभिनेत्री, साहाय्यक अभिनेता, प्रकाश, नेपथ्य, संगीत, पाश्र्वसंगीत, रंगभूषा, लोकप्रिय नाटक, लक्षवेधी नाटक आणि सवरेत्कृष्ट नाटक आदी गटांतही नामांकने जाहीर झाली आहेत.
चित्रपट विभागासाठी सवरेत्कृष्ट चित्रपट म्हणून ७२ मैल एक प्रवास, डॉ. प्रकाश बाबा आमटे- द रिअल हिरो, दुनियादारी, भाखरखाडी सात किलोमीटर, फँड्री या चित्रपटांना नामांकने मिळाली आहेत. याशिवाय अन्य विभागांतही नामांकने जाहीर झाली आहेत. दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांसाठी सवरेत्कृष्ट मालिका म्हणून असावा सुंदर स्वप्नांचा बंगला, पुढचं पाऊल, माझे मन तुझे झाले, मानसीचा चित्रकार तो, सावर रे यांना नामांकने जाहीर झाली आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा