बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. नोराचे लाखो चाहते आहेत. ती सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतेच नोराचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोमुळे नोरा रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
नोराचे हे फोटो सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हुम्पलाने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. या फोटोमध्ये नोरासोबत गुरु रंधावा दिसत आहे. ते दोघेही गोव्याला असल्याचे म्हटले जात आहे. त्यांचा हा फोटो बिचवरचा आहे. नोरा आणि गुरु रंधावाला एकत्र पाहिल्यानंतर ते दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. त्या दोघांचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
आणखी वाचा : आराध्या बच्चनची ‘ती’ भविष्यवाणी ऐकून बच्चन कुटुंबियांना बसला होता धक्का
आणखी वाचा : मिसेस हाथी आणि मिसेस सोढीने विचारले जयाजीं बद्दल खाजगी प्रश्न बिग बी म्हणाले…
दरम्यान, ते दोघे कोणत्या म्युजिक व्हिडीओसाठी एकत्र आले आहेत की ते रिलेशनशिपमध्ये आहेत हे कोणाला माहित नाही. नोरा आणि गुरु रंधावाने नाच मेरी राणी या म्युझिक व्हिडीओमध्ये एकत्र काम केले आहे. हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं. तेव्हा पासून हे दोघं रिलेशनशिपमध्ये आले पाहिजे अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा होती.