बॉलिवूड अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. नोराचे लाखो चाहते आहेत. नोरा तिच्या डान्स आणि फॅशनमुळे नेहमीच चर्चेत राहते. नुकताच तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी तिच्या ड्रेसवरून तिला ट्रोल केले आहे.

नोराचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत नोरा गाडीतून उतरताना दिसते. नोराने पांढऱ्या रंगाचा बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे. अनेकांना नोराचा हा लूक आवडला तर काहींनी तिच्यावर टीका केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bollywood Pap (@bollywoodpap)

आणखी वाचा : तुझ्या घराचा रंग पावसाच्या पाण्याने उडाला म्हणणाऱ्यांना हृतिकचं भन्नाट उत्तर, म्हणाला…

व्हिडीओमध्ये नोराने परिधान केलेला ड्रेस नीट नसून ती सतत त्या ड्रेसला नीट करताना दिसत आहे. त्यामुळे नोराला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले आहे. ‘परिधान केलेल्या कपड्यांमध्ये तुम्हाला कम्फर्टेबल वाटतं नसेल तर तुम्ही असे कपडे बाहेर कुठे जाताना का परिधान करतात’, असे एक नेटकरी म्हणाला. ‘जेव्हा आपण सार्वजनिक ठिकाणी जात आहोत तेव्हा कम्फर्टेबल ड्रेस परिधान करणे महत्त्वाचे आहे. ती अस्वस्थ दिसत आहे,’ असे दुसरा नेटकरी म्हणाला. ‘त्या ड्रेसमध्ये तिला कम्फर्टेबल वाटतं नसल्याचे तिच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे….मग असे कपडे का घालायचे?’, असे तिसरा नेटकरी म्हणाला. आणखी एक नेटकरी म्हणाला,’एवढे कपडे पण का परिधान केले देवीजी.’

nora fatehi, nora fatehi trolled,
नोराच्या या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.

आणखी वाचा : समांथा आणि नागा चैतन्य खरंच विभक्त होणार? समोर आली भविष्यवाणी

नोराने 2013 मध्ये ‘रोर’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर ती अनेक चित्रपटांमध्ये दिसली. नोरा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटात अजय देवगण, सोनाक्षी सिन्हा, संजय दत्त आणि शरद केळकरसोबत दिसली होती.

Story img Loader