बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमचा ‘सत्यमेव जयते २’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षक चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात होते. अॅक्शनचा भरणा असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. त्यापाठोपाठ आता चित्रपटातील एक गाणे प्रदर्शित झाले आहे. हे गाणे सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे.
‘सत्य मेव जयते २’ या चित्रपटातील ‘कुसू कुसू’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्यामधील नोरा फतेहीचा डान्स पाहण्यासारखा आहे. हे गाणे आता पर्यंत ५० लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे. तसेच या गाण्याला ३ लाख लोकांनी लाइक केले आहे. सध्या हे गाणे सोशल मीडियावर चर्चेत आहे.
आणखी वाचा : पॉर्नोग्राफी प्रकरणानंतर शिल्पा शेट्टी-राज कुंद्रा पहिल्यांदाच दिसले एकत्र; घेतलं देवीचं दर्शन
जॉन अब्राहमचा ‘सत्यमेव जयते २’ हा चित्रपट २६ नोव्हेंबरला प्रदर्शित केला जाणार होता. मात्र आता त्याची तारीख बदलून २५ नोव्हेंबर करण्यात आली आहे. त्यामुळे २५ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रेक्षकांना सत्यमेव जयते हा चित्रपट चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, ‘सत्यमेव जयते 2’ या चित्रपटाचं दिग्दर्शन मिलाप झवेरी करत असून जॉनसोबतच अभिनेता मनोज बाजपेयीदेखील स्क्रीन शेअर करणार आहे. तसेच दिव्या खोसला कुमार, मनोज बाजपेयी, अनूप सोनी, हर्ष छाया हेदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. ‘सत्यमेव जयते 2’ हा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या सत्यमेव जयतेचा पुढचा भाग आहे.