बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यांगना नोरा फतेही तिच्या उत्कृष्ट डान्स आणि एक्सप्रेशन्ससाठी ओळखली जाते. आपल्या डान्सने लोकांची मनं जिंकण्यासाठी त्याने कोणतीही कसर सोडली नाही. नोरा फतेहीने तिच्या डान्सने बॉलिवूड चित्रपटांमध्ये धमाल केली आहे. नोराने पुन्हा एक नवा व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिने बॉलिवूडची ‘मस्तानी गर्ल’ दीपिका पदुकोणचं सुपरहिट गाणं ‘दीवानी मस्तानी’ वर उत्कृष्ट एक्सप्रेशन्ससह साडीमध्ये डान्स करून चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
अभिनेत्री नोरा फतेही हिने नुकतंच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर लेटेस्ट व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये तिने क्रीम कलरच्या नक्षीदार साडी परिधान केलेली दिसत आहे. साडीवर तिने जड दागिनेही घातले आहेत. या लुकमध्ये दीपिका पदुकोणच्या गाण्यावर नोरा फतेही जबरदस्त एक्स्प्रेशन्स देत आहे. नोराचा हा व्हिडिओ दीड लाखापेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना तिने एक कॅप्शन देखील लिहिलीय. ‘मशहूर मेरे इश्क की कहानी हो गई.’ असं लिहीत तिने हा व्हिडीओ शेअर केलाय.
याआधी नोराने याच ट्रेडीशनल लुकमध्ये काही फोटोज शेअर केले होते. या फोटोमध्ये अभिनेत्री नोराने तिच्या डोक्यावर पदर ठेवून चाहत्यांना घायाळ करणारे एक्सप्रेशन्स दिलेत. नोराचा हा लुक पाहून चाहते भलतेच तिच्यावर फिदा झाले आहेत. तिच्या या लुकमधील फोटो आणि व्हिडीओवर कमेंट करत तिचं कौतुक देखील केलं जातंय.
नोरा फतेहच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर नोराने तिच्या करिअरची सुरुवात ‘बिग बॉस’मधून केली होती. ‘दिलबर’ आणि ‘गर्मी’ गाण्यांमधून नोरा फतेहीला सर्वात जास्त लोकप्रियता मिळाली. नोरा अलीकडेच ‘छोड देंगे’ या गाण्यात दिसली होती. नोरा फतेहीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती अजय देवगण आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटात दिसणार आहे. नोरा शेवटची ‘भारत’ आणि ‘स्ट्रीट डान्सर’ या चित्रपटात दिसली होती.