बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. नोरा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत नोरा चाहत्यांच्या संपर्कात राहते. नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असणारी नोरा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. सध्या नोरा ही ‘डान्स दिवाने ज्युनियर्स’ या रिअॅलिटी शोमध्ये परिक्षक म्हणून आहे. पण गेल्या काही दिवसांपासून ती प्रेग्नंट आहे अशी चर्चा सुरु होती. आता यावर नोराने उत्तर दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : 50 Shades Of Gray: “मला बेडवर फेकले अन्…”, इंटिमेट सीन शूटचा डकोटाने सांगितला ‘तो’ धक्कादायक अनुभव

गेल्या अनेक दिवसांपासून नोरा फतेही प्रेग्नंट असल्याच्या चर्चा सुरु होत्या. या चर्चांना ऐकता नोराने सेटवर एक व्हिडीओ शेअर केला होता आणि तो व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. खरं तर नोरा हा व्हिडीओ शूट करत असताना मध्येच मर्जी आणि नीतू कपूर येतात. यावेळी मर्जी बोलतो की “आम्ही प्रेग्नंसीमध्ये होणाऱ्या त्रासाविषयी बोलत आहोत, तर दुसरीकडे नोरा स्वत: कडे बघण्यात व्यस्त आहे.” यावर उत्तर देत नोरा बोलते, “कारण मी प्रेग्नंट नाही.” यावर मर्जी बोलतो की “संपूर्ण जगाला ही माहिती देण्यासाठी धन्यवाद.”

आणखी वाचा : “ढालेपाटलांच्या सूना काही ऐकना”; शिवानीने शेअर केला भन्नाट व्हिडीओ

आणखी वाचा : अर्जुन कपूरची बहिण अंशुलाने कॅमेऱ्यासमोर काढून दाखवली ब्रा; प्रियांका चोप्रा, म्हणाली…

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहून नेटकरी असा अंदाज बांधत आहेत की कदाचित हे सर्व लोक नीतू कपूर यांची सून आलिया भट्टच्या प्रेग्नंसी विषयी चर्चा करत होते. नोराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nora fatehi lets out a secret about pregnancy has a hilarious conversation with neetu kapoor dcp