बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही लवकरच सुपरस्टार अजय देवगण याच्या ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ चित्रपटात झळकणारेय. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री नोरा फतेही तिच्या अदाकारीमुळे बरीच चर्चेत आलीय. तसं पाहायला गेलं तर नोरा नेहमीच तिच्या डान्स व्हिडीओमुळे सोशल मीडियावर चर्चेत असतेच. आता तिचं नवं गाणं ‘जालिमा कोका कोला’ हे आउट झालंय. या गाण्यात तिने आपल्या डान्स स्टेप्सनी साऱ्यांनाच घायाळ केलंय. या गाण्यातील अभिनेत्री नोरा फतेही हिचे ठूमके पाहून तिचे फॅन्स दिवाने झाले आहेत. हे गाणं रिलीज होताच काही तासांमध्येच हिट झालंय. त्यामूळे आता ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटासाठी प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढलीय.
अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री नोरा फतेही यांच्या ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटातील बहूप्रतिक्षीत ‘जालिमा कोका कोला पिला दे’ सॉंग आउट झालंय. हे गाणं गायिका श्रेया घोषाल हिने गायलंय. हे गाणं टी-सीरीजच्या बॅनरअंतर्गत रिलीज करण्यात आलं असून याचे लिरिक्स वायुने लिहिले आहेत. या गाण्यात फॅन्सना घायाळ करणारे डान्स स्टेप्स हे कोरिओग्राफर गणेश आचार्य यांनी बसवले आहेत.
या गाण्यात अभिनेत्री नोरा फतेही हिचा अनोखा अंदाज दिसून आला. या गाण्यात निळ्या रंगाचं शॉर्ट स्लिट स्कर्ट आणि टॉप परिधान करून आपल्या सौंदर्याचा जलवा दाखवला आहे. सोबतच हातात बांगड्या आणि ज्वेलरीमुळे तिचा हा देसी लूक फॅन्सना पसंतीस पडलाय. या गाण्यात तिने आपल्या धमाकेदार डान्सने फॅन्सना आपल्या तालावर थिरकवलंय.
अभिषेक दुधैया दिग्दर्शित ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ हा एक सत्य घटनेवर आधारित चित्रपट आहे. या चित्रपट अभिनेता अजय देवगण तत्कालीन भुज एयरपोर्टचा इन्चार्ज विजय कार्णिक याची भूमिका साकारलीय. १९७१ साली झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धातली कहाणी या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.