बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. नोराचे लाखो चाहते आहेत. नोरा फक्त तिच्या अभिनयामुळेच नाही तर तिच्या डान्सचे ही लाखो चाहते आहेत. नोरा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता नोराने तिला कशा मुलासोबत रिलेशनशिपमध्ये रहायला आवडेल ते सांगितले आहे. नोराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
नोराचा नुकताच एक म्युजिक व्हिडीओ प्रदर्शित झाला आहे. या म्युझिक व्हिडीओचे नाव डान्स मेरी रानी आहे. या व्हिडीओत नोराने अप्रतिम डान्स केला आहे. तिला पाहून काही नेटकऱ्यांना हॉलिवूडची लोकप्रिय गायिका शकिराची आठवण आली आहे. हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे.
आणखी वाचा : घटस्फोटानंतर समांथा आणि नागा चैतन्य पहिल्यांदाच आले समोरा-समोर अन्…
दरम्यान, नोराला तिच्या आयुष्यात कसा मुलगा पाहिजे आहे याचा खुलासा तिने केला आहे. तो क्रिएटीव्ह असला पाहिजे आणि त्याला स्केच काढता आलं पाहिजे. नोराने याचा खुलासा इंडियाज बेस्ट डान्सरमध्ये केला आहे. तर नोराच्या आयुष्यातला तो मुलगा होण्यासाठी टेरेंस लुइस आणि गुरु रंधावाने स्केच काढण्याचे प्रयत्न देखील केले आहेत. नोरा एक अप्रतिम डान्सर आहे.
आणखी वाचा : प्रियांकाला ‘या’ हॉलिवूड अभिनेत्यासोबत करायचेय लग्न
नोरा आता पर्यंत अनेक म्युजिक व्हिडीओमध्ये काम केले आहे. नोराच्या करिअरची सुरुवात ही बिग बॉसपासून झाली होती. त्यानंतर ती अनेक गाण्यांमध्ये दिसली. तिचे दिलबर आणि गर्मी ही गाणी सगळ्यात लोकप्रिय ठरली होती.