सुकेश चंद्रशेखर हा २०० कोटींचे मनी लाँड्रिंग प्रकरणी तुरुंगात आहे. काही दिवसांपूर्वी या प्रकरणावर अभिनेत्री नोरा फतेहीने घोटाळेबाज सुकेश चंद्रशेखर यांच्याविरोधात साक्ष दिली होती. त्यानंतर आता सुकेश चंद्रशेखरने त्यांच्या वकिलांमार्फत पुन्हा पत्र लिहिले आहे. या पत्रात सुकेशने बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही आणि जॅकलिन फर्नांडिस यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत.

सुकेश चंद्रशेखर यांनी पत्रात नोरा फतेहीवर गंभीर आरोप केले आहेत. यावेळी तो म्हणाला, “नोरा ही नेहमी जॅकलिनचा राग करायची. तिने अनेकदा जॅकलिनच्या विरोधात माझे ब्रेनवॉश करण्याचा प्रयत्न केला. कारण मी जॅकलिनला सोडून तिला डेट करावं, असं तिला वाटत होते. नोरा दिवसातून कमीत कमी १० वेळा मला कॉल करायची आणि जर मी तिचा फोन उचलला नाही तर ती सतत फोन करत राहायची.”

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
priyanka chopra rakesh roshan
“अंत्यसंस्कार सुरू असताना…”, प्रियांका चोप्राने सांगितलं ‘क्रिश’ चित्रपटासाठी तिची निवड कशी झाली, म्हणाली, “मला भीती वाटली…”
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!

नोराने नोंदवलेल्या जबाबात असा दावा केला आहे की, तिला गाडी नको होती. पण हे खोटं आहे, असा दावा सुकेशने केला आहे. यावेळी तो म्हणाला, “ती स्वत: तिची गाडी बदलण्यासाठी माझ्या मागे लागली होती. त्यावेळी तिच्याकडे मर्सिडीजची CLA गाडी होती. पण ती फार स्वस्त आहे असं तिला वाटायचे. त्यामुळे आम्ही दोघांनी मिळून एका गाडीची निवड केली. माझ्या चॅट्स आणि स्क्रीनशॉट्स ईडीकडे आहेत. त्यामुळे त्यात काही खोटे नाही. खरंतर मला तिला रेंज रोव्हर द्यायची होती. पण त्यावेळी त्या गाड्या उपलब्ध नव्हत्या आणि तिला लगेचच गाडी हवी होती. त्यामुळे मी तिला बीएमडब्ल्यू एस सीरीज ही गाडी घेऊन दिली. ही गाडी तिने बराच काळ वापरली.”

“नोरा ही भारतीय नाही. त्यामुळे तिने या गाडीची नोंद तिच्या एका मैत्रिणीचा पती बॉबीच्या नावे केली होती. माझ्या आणि नोरामध्ये कोणताही व्यावसायिक व्यवहार झाला नाही. तिने एकदा फक्तर फाऊंडेशनने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात सहभाग घेतला होता. त्यासाठी तिने काही पैसे दिले होते. मी आणि जॅकलिन रिलेशनशिपमध्ये होतो, त्यामुळे मी नोराकडे दुर्लक्ष केले. पण ती मला कॉल करुन सतत त्रास द्यायची. मला एक संगीत निर्मिती कंपनी स्थापन करायची आहे, असे ती वारंवार सांगायची, यासाठी मी तिला मदत केली होती”, असेही सुकेशने या पत्रात म्हटले आहे.

दरम्यान सुकेश सध्या तिहार तुरुंगात आहे. त्याच्यावर २०० कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे. जॅकलिन, नोरा यांच्यासारख्या अनेक अभिनेत्रींना त्याने महागड्या भेटवस्तू देऊन स्वतःच्या जाळ्यात ओढले होते. या दोघींशिवाय सारा अली खान, चाहत खन्ना यांचेही नाव जोडले जाते. सुकेशने फोर्टिस हेल्थकेअरचे माजी प्रमोटर शिविंदर मोहन सिंह यांच्या पत्नी अदिती सिंह यांच्यासह अनेकांची फसवणूक केली आहे.

Story img Loader