‘दी अमेझिंग स्पायडर मॅन-२’ हॉलिवूडपटाच्या हिंदी आवृत्तीसाठी आपला आवाज देणारा अभिनेता विवेक ओबेरॉयने आपण हॉलिवूडमध्ये काम करण्यास उतावीळ नसून, जर चांगली भूमिका मिळाली, तर आपण ती स्विकारणार असल्याचे म्हटले आहे. याविषयी बोलताना तो म्हणाला, हॉलिवूड चित्रपटात काम करण्यासाठी मी उतावीळ नाही. जो चित्रपट मला आकर्षित करत नाही, अशा चित्रपटात मला केवळ पाच मिनिटांची भूमिका करण्यात रस नाही. माझ्यासाठी चांगली भूमिका असणे महत्वाचे असून, जर का मला भूमिकेने आकर्षित केले, तर नक्की मी ती भूमिका साकारेन. स्पायडरमॅनचा खूप मोठा चाहता असल्याने ‘दी अमेझिंग स्पायडर मॅन-२’ चित्रपटातील इलेक्ट्रो या व्यक्तिरेखेला आपला आवाज देण्यासाठी तयार झाल्याचेदेखील विवेक म्हणाला. अनिल कपूर, अमिताभ बच्चन, इरफान खान, अनुपम खेर आणि अन्य अनेक बॉलिवूड कलाकारांनी हॉलिवूडमधील चित्रपटांमधून काम केले आहे. मूळ चित्रपटात ‘इलेक्ट्रो’ची व्यक्तिरेखा जमै फॉक्स या ऑस्कर पुरस्कार विजेत्या अभिनेत्याने साकारली आहे. याआधी विवेकने ‘कंपनी’, ‘शूट आऊट अॅट लोखंडवाला’, ‘रक्त चरित्र’ आणि ‘क्रिश-३’ अशा चित्रपटांमधून खलनायकी भूमिका साकारली आहे

Story img Loader