प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ या ऐतिहासिक चित्रपटानंतर आता लवकरच त्यांचा आणखी एक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘शेर शिवराज’ (Sher Shivraj) असे या चित्रपटाचे नाव आहे. दिग्पाल लांजेकर आणि चिन्मय मांडलेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणारे एकूण ८ चित्रपट अर्थात ‘श्री शिवराज अष्टक’ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. याच अष्टकामधील चौथा चित्रपट ‘शेर शिवराज’ हा चित्रपट येत्या २२ एप्रिल २०२२ रोजी प्रदर्शित होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या चित्रपटात अभिनेता चिन्मय मांडलेकरचं शिवरायांची भूमिका साकरणार आहे. मॉं जिजाऊंच्या भूमिकेत मृणाल कुलकर्णी पुन्हा एकदा झळकणार आहे. पण सगळ्यांचे लक्ष हे बहिर्जी नाईक यांच्या भूमिकेने वेधले आहे. बहिर्जी नाईक यांच्या भूमिकेत एक नवा चेहरा आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर सगळ्यांचा लाडका दिग्पाल लांजेकर बहिर्जी नाईक यांच्या भूमिकेत दिसणार आहे. यानिमित्तानेच आपल्या सगळ्यांना दिग्पाल लांजेकरचा अभिनय पाहायला मिळणार आहे. दिग्पालने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून याविषयी माहिती दिली आहे.

आणखी वाचा : अभिनेता आणि पटकथालेखक शिव कुमार सुब्रह्मण्यम यांचे निधन

आणखी वाचा : राष्ट्रवादी नेत्या रुपाली चाकणकर यांचा मुलगा ‘या’ चित्रपटातून करणार सिनेसृष्टीत पदार्पण

आणखी वाचा : आराध्याने साकरली सीतेची भूमिका, राम नवमीच्या आधी फोटो झाले व्हायरल

दरम्यान, ‘पावनखिंड’ या चित्रपटात बहिर्जी नाईक ही भूमिका अभिनेता हरिश दुधाडेने (Harish Dudhade) साकारली होती. आता दिग्पाल या भूमिकेत दिसणार असून या भूमिकेवर ‘शिवबा राजं’ हे गाणंही शूट करण्यात आलं आहे. पण दिग्पालची पोस्ट पाहिल्यानंतर काही नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कारण ते हरिशला मिस करत आहेत. एक नेटकरी म्हणाला, “हरिश दुधाडे यांना बदलण्याचा निर्णय नाही आवडला ते नाईकांच्या भूमिकेत चपखल बसत होते.” दुसरा नेटकरी म्हणाला, “हरिश दुधाडेच पाहिजे होता बहिर्जींच्या भूमिकेत.” तिसरा नेटकरी म्हणाला, “नाईक का बदलले.” आणखी एक नेटकरी म्हणाला, “बहिर्जी नाईक यांच्या भूमिकेसाठी हरिश दुधाडेच बरोबर होता.”

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Not harish dudhade digpal lanjekar to play the role of bahirji naik in sher shivraj dcp