पॉर्न स्टार सनी लिओनी ही प्रेक्षकांचे लक्ष्य वेधण्यात यशस्वी झाल्यामुळे आनंदात आहे. मात्र, बॉलीवूडमध्ये हवी असलेली उंची ती गाठू शकली आहे की नाही याबाबत ती अद्यापही साशंक आहे.
‘जिस्म २’ या चित्रपटाने बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी सनीने बिग बॉस या रियालिटी शोमध्ये सहभाग घेतला होता. तिने शूटआउट अॅट वडालामध्ये आयटम साँगमध्ये केल्यानंतर ‘जॅकपॉट’, ‘रागिनी एमएमएस २’ या चित्रपटांमध्ये काम केले. सनी एका मुलाखतीत म्हणाली की, मला वाटतं प्रेक्षकांचे लक्ष्य वेधण्यात मी यशस्वी झाले आहे, आज मी जिथे पोहचले आहे याचा मला आनंद आहे. चित्रपटसृष्टीत मला चांगले काम करायचे असून लोकांचे निखळ मनोरंजन करायचे आहे. ‘रागिनी एमएमएस २’ला मिळालेल्या प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळे सनी खूश आहे. ती म्हणाली की, मला वाटलं नव्हतं की चित्रपटाला इतका चांगला प्रतिसाद मिळेल. चित्रपट पाहणा-या माझ्या चाहत्यांचे मी आभारी मानते. या चित्रपटानंतर तिला अनेक ऑफर्स आल्या. मात्र, सनी सध्या कोणताही चित्रपट करण्याच्या घाईत नाही. मला चित्रपटाच्या ऑफर्स येत आहेत. बहुतेक, लोकांना कळलं आहे की मी इथे केवळ पाच मिनिटाच्या भूमिकेसाठी नाही. माझ्या कामावर अधिक मेहनत घेऊन मी अजून चांगले काम करेन, असे सनी म्हणाली.
बॉलीवूडमध्ये केवळ ५ मिनिटाच्या भूमिकांसाठी नाही- सनी लिओनी
'जिस्म २' या चित्रपटाने बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी सनीने बिग बॉस या रियालिटी शोमध्ये सहभाग घेतला होता.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have a account? Sign in
First published on: 06-06-2014 at 12:56 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Not in bollywood for 5 minute role sunny leone