शाहरुखच्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’चा रेकॉर्ड ब्रेक करत आमिरच्या ‘धूम ३’ ने जवळजवळ ४०० कोटींच्यावर गल्ला जमविला आहे. या दोन्ही खानांच्या चित्रपटांना टक्कर देण्यासाठी सलमानचा ‘जय हो’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कोटींची कमाई करतो आणि नवा रेकॉर्ड बनविण्यात यशस्वी ठरतो का, हे पाहण्यासाठी सलमानचे सर्वच चाहते उत्सुक आहेत.
बॉ़क्स ऑफीसच्या या रेसमध्ये ‘खाना’वळीत चांगलीच चढाओढ लागेल, असे वाटत असतानाच सलमानने नवाच धमाका केला आहे. आपण बॉक्स ऑफीसच्या रेसमध्ये नसल्याचे सलमान स्वतः म्हणाला आहे. सलमान म्हणाला की, बॉक्स ऑफीसवरचे रेकॉर्ड मोडण्यावर माझा विश्वास नाही. हा पण, चित्रपटाने चांगले प्रदर्शन करावे, असे मला वाटते. चित्रपटाचा निर्माता, वितरक आणि निदर्शकांना कोणताही तोटा सहन करावा लागू नये. २००-३०० कोटींच्या आकड्यांमध्ये मला अजिबात रस नाही. मी इथे आहे पण माझ्यावर रेकॉर्ड तोडण्याचा तणाव नाही आहे. मला फक्त चांगले चित्रपट द्यायचे आहेत. माझे चित्रपट यशस्वी होत आहेत आणि व्यवस्थित कमाईदेखील करत आहेत यातच मी खूश आहे, असेही तो म्हणाला. 

Story img Loader