‘दिल दोस्ती’ चित्रपटानंतर दिग्दर्शक मनिष तिवारीचा आता ‘इश्क’ हा चित्रपट येणार आहे. अमर्या दस्तुर ही अभिनेत्री या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण करत असून प्रतिक बब्बरसुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. दिग्दर्शक मनिष तिवारीला प्रतिकऐवजी ही भूमिका इमरान खानने करावी असे वाटत होते. काही कारणास्तव तसे होऊ शकले नाही. पण,  प्रतिकची एका चित्रपटातील भूमिका पाहिली आणि ती आवडल्यामुळे त्याची निवड करण्यात आल्याचे मनिषने सांगितले.
‘इश्क’ व्यतिरीक्त मनिष ‘मोहब्बत मिया’ चित्रपटावर काम करत आहे. या चित्रपटासाठी आमिरला घेण्यात येणार आहे. मनिष म्हणाला की, मी ब-याच काळापासून ‘मोहब्बत मिया’ची पटकथा लिहत आहे. ‘मोहब्बत मिया’ चित्रपटाची पटकथा लिहताना आमिरचीच प्रतिमा माझ्यासमोर होती. चित्रपटात आमिरलाच घेण्यात येणार असून तारखा प्राप्त होईपर्यंत त्याची प्रतिक्षा करेन असे मनिष म्हणाला.

Story img Loader