भारतीय चित्रपटसृष्टीवर गेली बरीच वर्षं सलमान, शाहरुख आणि आमिर अशा तीन खान लोकांचं वर्चस्व होतं. नंतर यामध्ये अक्षय कुमारने एन्ट्री घेतली. गेल्यावर्षी चित्रपट चांगलाच फ्लॉप झाल्याने आमिर खान या शर्यतीतून बाहेर पडला. गेली बरीच वर्षं सलमान, शाहरुख अन् अक्षय कुमार हे भारतातले सर्वात जास्त मानधन घेणारे अभिनेते होते. आता यांना मागे टाकत एका दाक्षिणात्य अभिनेत्याचं नाव समोर आलं आहे.

या बॉलिवूडच्या सुपरस्टार्सना मागे टाकत दाक्षिणात्य अभिनेता थलपती विजय हा भारतातील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता ठरला आहे. आधीदेखील विजयने त्याच्या चित्रपटासाठी १०० कोटी मानधन घेत रेकॉर्ड केला होताच, आता ‘थलपती ६८’ या आगामी चित्रपटासाठी विजयने २०० कोटी रुपये मानधन आकारल्याचं समोर आलं आहे.

Rajesh Khanna, sanjeev kumar
राजेश खन्नांपेक्षा शत्रुघ्न सिन्हा, संजीव कुमार वाईट होते, असं का म्हणाल्या शबाना आझमी?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
Veteran Telugu Actor Mohan Babu
दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील बड्या कुटुंबात वाद; ज्येष्ठ अभिनेत्याने पत्रकारावर केला हल्ला, पोलिसांत तक्रार दाखल
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
Shahrukh Khan
“अबराम व आर्यनचा…”, शाहरुख खान दोन्ही मुलांसह एकत्र काम करणार; अनुभव सांगत म्हणाला…
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
salman khan mother danching with helan
Video : सलमान खानच्या आईने हेलन यांच्याबरोबर धरला ठेका; उपस्थितही पाहतच राहिले, व्हिडीओ होतोय व्हायरल

आणखी वाचा : २४ वर्षं झाली, तरी ‘कोहराम’चित्रपटानंतर अमिताभ बच्चन व नाना पाटेकरांनी एकत्र काम का केलं नाही? जाणून घ्या

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजपर्यंत कोणत्याही भारतीय सुपरस्टारने एवढं मानधन घेतलेलं नाही यामुळेच त्याची सर्वात जास्त चर्चा होत आहे. चित्रपटासाठी २०० कोटी मानधन घेणारा विजय हा पहिला अभिनेता ठरला आहे. लवकरच विजय राजकारणातही प्रवेश घेणार आहे आणि ‘थलपती ६८’ हा त्याचा शेवटचा चित्रपट असू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.

याबरोबरच विजय लवकरच लोकेश कनगराजच्या ‘लिओ’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. या चित्रपटातील एका गाण्यामुळे विजयच्या विरोधात पोलिसांत तक्रार केल्याचं स्पष्ट झालं आहे. ‘लिओ’ चित्रपटातील ‘ना रेडी’ या गाण्यात ड्रग्स आणि दारूच्या सेवनाचे समर्थन केल्याचा आरोप विजय आणि ‘लिओ’च्या निर्मात्यांवर करण्यात आला आहे. हा चित्रपट १९ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे आणि हा या वर्षातील बहुप्रतीक्षित तमिळ चित्रपटांपैकी एक आहे.

Story img Loader