आमीर खानची भूमिका असलेल्या पीके या चित्रपटाची कथा ही आपल्या ‘फरिश्ता’ या २०१३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या कादंबरीतून काही प्रमाणात चोरलेली असून हा वाङ्मयचौर्याचा प्रकार आहे. या कादंबरीकाराने दाखल केलेल्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने निर्माते व दिग्दर्शक यांना नोटीस दिली आहे.
न्या. नजमी वझीरी यांनी सांगितले की, विधू विनोद चोप्रा व राजकुमार हिराणी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्यांच्या निर्मात्या कंपन्या व कथालेखक अभिजात जोशी यांना १६ एप्रिल रोजी उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारसमोर पुरावे देण्यासाठी उपस्थित रहावे अशी नोटिस जारी करण्यात आली असून निर्मात्यांनी या आरोपावर आपले म्हणणे संयुक्त रजिस्ट्रारपुढे मांडावे.
न्यायालयाने कपील इसापुरी यांनी चोप्रा व हिराणी यांच्यावर केलेल्या आरोपावरून नोटिसा जारी केल्या असून त्या कंपन्या, पटकथा लेखक  यांना पाठवण्यात आल्या आहेत. पटकथा लेखक जोशी यांनी कथा, पात्रे, कल्पना आविष्करण व दृश्ये यात आपल्या कादंबरीतून वाङ्मय चौर्य केले आहे. आपल्याला याबाबत १ कोटी रुपये भरपाई मिळावी व श्रेयही मिळावे अशी मागणी त्यांनी केली. वकील ज्योतिका कालरा यांच्यामार्फत इसापुरी यांनी असा दावा केला की, आपली कादंबरी आंधळेपणाने धर्मगुरूंचे अनुकरण करण्यावर टीका करते. शिवाय धर्म हा नैसर्गिक व्यवसाय नसून मनुष्यनिर्मित व्यवसाय असल्याचे सांगते. लोकांचा एक गट असेल तर त्यात कुणी कुणाचा धर्म सांगू शकत नाही. चित्रपटात उपस्थित केलेले अनेक प्रसंग आपल्या कादंबरीतही आहेत व या चित्रपटातही आहेत. त्यात केवळ किरकोळ फेरफार केले आहेत. पीके या चित्रपटात आमीर खान, अनुष्का शर्मा, संजय दत्त, सुशांत सिंग राजपूत यांच्या भूमिका असून त्यात तथाकथित आध्यात्मिक गुरूंवर टीका आहे.
आमीर हा परग्रहावरून आलेला एक परग्रहवासीय असतो व तो पृथ्वीच्या संशोधनासाठी आलेला असतो व तो पत्रकार असलेली जगत (अनुष्का) हिच्याशी मैत्री करतो. धार्मिक गोष्टी  व अंधश्रद्धा यांच्यावर त्यात कोरडे ओढले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा