अर्जुन कपूर आणि दीपिका पदुकोण यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘फाईंडिंग फॅनी’ या चित्रपटाचे संकलन करण्यासाठी थेट हॉलीवूडमधून निक मूरे यांना पाचारण करण्यात आले आहे. हॉलीवूडमध्ये गाजलेल्या ‘नॉटिंग हिल’ आणि ‘लव्ह अॅक्च्युली’ या चित्रपटांचे संकलक म्हणून निक मूरे ओळखले जातात. आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रदर्शित करण्याच्या दृष्टीने ‘फाईंडिंग फॅनी’ या चित्रपटात करण्यात येणाऱ्या महत्वपूर्ण संकलनासाठी निक मुरे यांची मदत घेण्यात येणार आहे. युरोप, अमेरिका यांच्याबरोबरीने आतापर्यंत एकही भारतीय चित्रपट प्रदर्शित न झालेल्या पूर्व युरोपमध्ये ‘फाईंडिंग फॅनी’ प्रदर्शित करण्यात येणार आहे. भारतामध्ये हा चित्रपट येत्या १२ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. होमी अदजानियाचे दिग्दर्शन असलेल्या चित्रपटात दीपिका पदुकोण, अर्जुन कपूर अशी वेगळी जोडी आणि नासिर, डिम्पल, पंकज कपूर यांच्यासारखे कलाकार यामुळे ‘फाईंडिंग फॅनी’ सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. 

Story img Loader