मोटरसायकल उत्पादन करणाऱया सुझूकी कंपनीने सलमान खानच्या ‘बीईंग ह्यूमन’ फाऊंडेशन बरोबर भागिदारी केली असून त्यानुसार ‘बीईंग ह्यूमन-सुझूकी’ यांची एक नवी दुचाकी ‘सुझूकी अॅसेस’ लवकरच बाजारात दाखल होणार आहे. तसेच या भागिदारीनुसार ‘बीईंग ह्यूमन’ फाऊंडेशनचे प्रमोशन करणारे कपडेसुद्धा सुझूकीच्या शो-रुममध्ये उपलब्ध होणार आहेत.
सुझूकीबरोबर केलेल्या भागिदारीमुळे ‘बीईंग ह्यूमन’ फाऊंडेशनची व्याप्ती वाढण्यास मदत होईल. असे बॉलीवूड स्टार सलमान खान म्हणाला.
सलमानने २००९ साली ‘बीईंग ह्यूमन’ या सामाजिक संस्थेची स्थापना केली. सध्या मुंबई, लुधियाना आणि अहमदाबाद येथे ‘बीईंग ह्यूमन’ कार्यरत आहे. आता या भागिदारी नंतर याच नावाखाली काही हॉटेल्स आणि रुग्णालये उभारण्याचा सलमानचा मानस आहे.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Oct 2013 रोजी प्रकाशित
सुझूकीच्या ‘शो-रुम’मध्ये सलमानच्या ‘बीईंग ह्यूमन’चे टी-शर्ट्स
मोटरसायकल उत्पादन करणारी सुझूकी कंपनीने सलमान खानच्या 'बीईंग ह्यूमन' फाऊंडेशन बरोबर भागिदारी केली असून त्यानुसार 'बीईंग ह्यूमन-सुझूकी' यांची एक नवी दुचाकी

First published on: 03-10-2013 at 01:24 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now available salman khans being human merchandise at a bike showroom