सैफ अली खानने करिना कपूरशी निकाह केल्यानंतर लगेचच सोहा अली खान व कुणाल खेमूच्या लग्नाचीही चर्चा रंगली होती. काही वर्षांपासून सोहा-कुणाल यांचे प्रेमसंबंध असून आता पुन्हा त्यांच्या विवाहाची चर्चा केली जात आहे. अर्थात बॉलीवूडमधील अनेक कलावंतांच्या लग्नाची चर्चा अधूनमधून होतच असते. परंतु, सोहा अली खानची आई शर्मिला टागोरने खारच्या उच्चभ्रू परिसरात ९ कोटी रुपयांचे आलिशान घर खरेदी करून कन्या सोहाला भेट दिल्यामुळे सोहा-कुणालच्या लग्नाची चर्चा अधिकच रंगली आहे.  
‘साहिब, बिवी और गँगस्टर’ नंतर सोहा अली खान आता ‘चार फूटियाँ छोकरे’ आणि श्रेयस तळपदेसोबतच्या एका रोमॅण्टिक कॉमेडीपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. तर कुणाल खेमूसुद्धा सैफ अली खानसोबत ‘गो गोवा गॉन’ या चित्रपटाच्या कामत व्यस्त असल्याने विवाह कधी करणार याबाबत दोघांपैकी कुणीच अद्याप माहिती देत नाही. मात्र, कुणाल खेमूने सोहा अली खानसोबत विवाह करणार असल्याचे मान्य केले असून अद्याप मुहूर्त सापडलेला नाही, असे म्हटले आहे.

Story img Loader