बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँ हिचा आज वाढदिवस. ८ जानेवारी १९९० रोजी कोलकाता येथे जन्मलेल्या नुसरतनं ‘शोत्रु’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर ती ‘खोका ४२०’ या चित्रपटात दिसली. नुसरतचं अभिनय क्षेत्रातील करिअर चांगलं राहिलं पण आपल्या करिअरपेक्षा ती सर्वाधिक चर्चेत राहिली ती खासगी आयुष्यातील वादग्रस्त कारणांमुळे.

चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याआधी नुसरतनं मॉडेलिंगमध्ये आपल्या करिअरला सुरुवात केली होती. २०१० साली तिनं आपल्या मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली. त्याच वर्षी ती ‘फेअर वन मिस कोलकाता’ झाली. एक अभिनेत्री ते तृणमूल काँग्रेसची खासदार हा प्रवास नुसरतनं उत्तमप्रकारे पार केला. बंगालच्या बशीरहाटमधून निवडणूक लढवणाऱ्या नुसरतनं ही निवडणूक ३.५ लाख मतांनी जिंकली.

Suresh Dhas On Santosh Deshmukh
Suresh Dhas : “आका हा सोपा आका नाही, ठराविक लोकांना प्रत्येक महिन्याला…”, आमदार सुरेश धस यांचा गंभीर आरोप
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
article about social and political polarization facing by american media
वृत्तवाळवंट सुफलाम करण्यासाठी…
prince narula yuvika chaudhary lohri celebration with daughter
सोशल मीडियावरील मतभेदानंतर ‘बिग बॉस’ फेम जोडपे प्रथमच दिसले एकत्र; लेकीसह साजरी केली लोहरी, फोटो आले समोर
star pravah aboli serial new actress entry jahnavi killekar and mayuri wagh
‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत २ नव्या अभिनेत्रींची एन्ट्री! जान्हवी किल्लेकरचा पहिला लूक आला समोर, तर दुसरी नायिका कोण?
Paaru
Video: “देवीआईंनासुद्धा कळायला पाहिजे…”, पारू अनुष्काचे सत्य अहिल्यादेवीसमोर आणणार? मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
actor arun singh rana divorce
“मी खचलो होतो”, प्रसिद्ध अभिनेत्याने केली घटस्फोटाची घोषणा; अतुल सुभाषशी स्वतःची तुलना करत म्हणाला, “माझ्या आयुष्यातील…”
loksatta chatura A mother taking custody of her child is not kidnapping telangana high court decision
आईने अपत्याचा ताबा घेणे अपहरण नव्हे

बलात्काऱ्यांला डेट करत असल्याचा लागला होता आरोप
नुसरतनं जेव्हा अभिनय क्षेत्रात करिअरला सुरुवात केली होती त्यावेळी तिचं नाव कादिर खानशी जोडलं गेलं होतं. फेब्रुवारी २०१२ मध्ये पार्क स्ट्रीटवर धावत्या कारमध्ये एका एंग्लो इंडियन महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोप या कादिर खानवर होता. कादिर खानसह इतर ५ व्यक्तींना या प्रकरणी अटक झाली होती. २०१२ साली नुसरत तिचा बॉयफ्रेंड कादिरशी लग्न करणार होती. जेव्हा पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली तेव्हा, ‘या घटनेनंतर मी कादिर कधीच भेटले नाही’ असं नुसरतनं सांगितलं होतं.

मागच्या काही काळापासून नुसरत तिच्या कथित लग्नामुळे सातत्यानं चर्चेत आहे. २०१९ साली निखिल जैनशी लग्नगाठ बांधली होती. पण एक वर्षानंतर नुसरतनं हे लग्न अवैध असल्याचं म्हणत त्याच्याशी नातं तोडलं. आपल्या स्टेटमेंटमध्ये नुसरतनं, ‘आमचं लग्न हे भारतीय कायद्यानुसार झालं नव्हतं.’ असं म्हटलं होतं. दरम्यान तिचं नाव अभिनेता यश दासगुप्ताशी जोडलं गेलं. त्यानंतर तिची प्रेग्नन्सी आणि तिच्या बाळाचे वडील कोण यावरून बरेच वाद झाले. अखेर यश दासगुप्ताच तिच्या बाळाचे वडील असल्याचं तिने मान्य केलं.

Story img Loader