खासदार आणि बंगालच्या अभिनेत्री नुसरत जहाँ कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असतात. निखिल जैनपासून विभक्त होऊन मुलाला जन्म दिल्यापर्यंत अनेक गोष्टींमुळे त्या चर्चेत राहिल्या आहेत. आता पर्यंत त्या अभिनेता यश दासगुप्तासोबत त्यांच्या नात्यावर काही बोलत नव्हत्या. मात्र, आता हळूहळू सोशल मीडियावर फोटो त्यांनी शेअर केले. दोन महिन्यांपूर्वी नुसरत यांनी त्यांच्या मुलाला जन्म दिला. नुसरत आता काश्मिरमध्ये यशसोबत एन्जॉय करत आहेत. ते फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केले आहे.

नुसरत यांनी हे फोटो त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंवरून शेअर केले आहेत. या फोटोमध्ये नुसरत या छत्री घेऊन उभ्या आहेत. मागे बर्फ दिसत आहे. मात्र, त्यांच्या या फोटोचा आणि यशचा संबंध आहे. “जर किस ही बर्फांच्या तुकड्याची असती तर मी तुला बर्फाच वादळ पाठवलं असतं”, असं कॅप्शन नुसरत यांनी त्या फोटोला दिलं आहे. त्यासोबतच कश्मीर व्हॅली, स्नोफॉल, हॉट चॉकलेट वेदर आणि विंटर रोमान्स हे हॅशटॅग नुसरत यांनी वापरले आहे. या फोटोचं क्रेडिट नुसरत यांनी यश गुप्ताला दिलं आहे.

आणखी वाचा : ५ हजार कोटी रुपयांचा मालक असूनही ‘या’ कारणामुळे मुलांना एक रुपयाही देऊ शकत नाही सैफ

नुसरत यांचे हे फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं आहे. “तुला लाज वाटली पाहिजे. तुझ्या चाहत्यांना बाळासोबतचे फोटो पाहायचे आहेत. जे प्रत्येक स्त्री ही आई झाल्यावर करते. दुसरीकडे तू आहेस, जी नेहमी एकटीचे फोटो शेअर करते. काळजी करू नकोस हे सगळं तुझ्यासोबत सुद्धा होईल,” अशी कमेंट करत एका नेटकऱ्याने नुसरतला ट्रोल केलं आहे.

आणखी वाचा : Photo : ‘मुळशी पॅटर्न’चे चाहते जेव्हा ‘अंतिम’चा ट्रेलर बघतात तेव्हा…, सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव

आणखी वाचा : अभिनेता आर माधवनच्या मुलाने महाराष्ट्रासाठी जिंकली ७ पदक

नुसरत यांनी त्यांच्या आणि यशच्या लग्नाविषयी कोणतीही गोष्ट सांगितलेली नाही. मात्र, काश्मीरमधून नुकताच त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत नुसरत यांनी त्यांच्या हातातली आणि यशच्या हातातली अंगठी दाखवली आहे.

Story img Loader