बंगाली अभिनेत्री आणि टीएमसीच्या खासदार नुसरत जहां सध्या गर्भवती आहेत. यावरून नुसरत आणि पती निखिल जैन यांच्यात वाद सुरु आहेत. नुसरत सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत नुसरत चाहत्यांच्या संपर्कात राहतात. नुकतीच नुसरतने तिच्या मैत्रिणींसोबत आणि कुटुंबासोबत पार्टी केली. त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पुन्हा एकदा नुसरत ट्रोलचा शिकार झाल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुकतीच नुसरत आणि त्यांची मैत्रिण आणि अभिनेत्री तनुश्री आणि श्रबंतीसोबत दिसल्या आहेत. तनुश्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्या तिघी दिसत आहेत. हा फोटो शेअर करत तनुश्रीने हार्ट इमोजी वापरले आहेत.

आणखी वाचा : आमिर आणि किरण रावच्या घटस्फोटानंतर इम्रानच्या पत्नीने केली होती ‘ही’ पोस्ट

आणखी वाचा : ‘वडिलांच्या तिसऱ्या लग्नाची तयारी…’, बॉयफ्रेंड नुपुरसोबत शॉपिंगकेल्यामुळे आयरा झाली ट्रोल

गर्भवती असताना पार्टी केल्यामुळे नुसरत जहां झाल्या ट्रोल

नुसरत यांचे हे फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केले आहे. काही लोकांनी नुसरत यांचे हे फोटो पाहिल्यानंतर त्यांना गर्भवती असताना आनंदी राहण्यास सांगितलं आहे. तर काही लोकांना हे मुळीच आवडलेलं नाही आणि त्या नेटकऱ्यांनी नुसरत यांना ट्रोल करायला सुरुवात केली आहे. एक नेटकरी म्हणाला, ‘तिघींनी ड्रग्सचे सेवन केले आहे.’ तर दुसरा नेटकरी म्हणाला की, ‘तिघींच्या डोळ्यात नशा केल्याचे दिसत आहे.’ नुसरत पहिल्यांदाच सोशल मीडियावर ट्रोल झाल्या नाही आहेत. या आधीही बऱ्याच वेळा त्या ट्रोल झाल्या आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nusrat jahan party with her friends tnusree and srabanti during pregnancy trolls says looking drunk dcp