खासदार आणि बंगालच्या अभिनेत्री नुसरत जहाँ नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. निखिल जैनपासून विभक्त होऊन मुलाला जन्म दिल्यापर्यंत अनेक गोष्टींमुळे त्या चर्चेत राहिल्या आहेत. त्यानंतर आता नुकतंच नुसरत जहाँ यांनी बॉयफ्रेंड आणि अभिनेता यश दासगुप्तासोबतच्या नात्याबद्दल अनेक खुलासे केले आहे. नुकतंच एका रेडिओ शो दरम्यान नुसरत यांनी याबाबतचा खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नुसरत जहाँ यांनी नुकतंच एका रेडिओ शो ला हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी सांगितले, एकेकाळी माझे आणि यशचे नाते हे तुटण्याच्या मार्गावर होते. पण मी अगदी फिल्मी पद्धतीने ते वाचवण्याचा प्रयत्न केला. काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर माझ्यावर इतके वैयक्तिक हल्ले झाले की मी त्याच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

“पण एके दिवशी यश माझ्या घराखाली आला आणि त्याने मला त्याच्या गाडीत बसायला सांगितले. त्यावेळेस आमच्यात काहीही चांगले चालले नव्हते. पण नंतर सर्व काही ठीक झाले. त्यानंतर मग आम्ही एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आणि यानंतरच आम्हा दोघांचा खरा प्रवास सुरु झाला,” असे नुसरत जहाँ यांनी सांगितले.

या शोमध्ये नुसरत आणि यशच्या लव्ह स्टोरीबाबत विचारण्यात आल्यावर यशनं नुसरतला याचं उत्तर देण्यास सांगितलं. त्यानं तिला विचारलं, ‘हे सर्व कसं सुरू झालं?’ या प्रश्नाचं उत्तर देताना नुसरत म्हणाली, ‘मी तुझ्यासोबत पळून गेले होते.’ त्यावर यश म्हणतो, ‘तू पळून गेली होतीस? तुझं म्हणणं आहे की, आपण दोघं एकमेकांचा हात पकडून रस्त्यावर पळत होतो?’ यशच्या बोलण्यावर नुसरत म्हणते, ‘नाही, नाही. मी तुझ्यासोबत फरार झाले होते. असं म्हणणं अधिक चांगलं ठरेल. हो, मी तुझ्यासोबत फरार झाले होते.’

नुसरतनं या एपिसोडमध्ये बरेच खुलासे केले आहेत. तिने सांगितलं की, ‘हा एपिसोड ‘माझं प्रेम, माझी निवड’ यावर आधारित आहे. मी तुझ्या प्रेमात पडले आहे आणि ही माझी निवड आहे. बाकी सर्व तर फक्त भूतकाळ आहे.’ यानंतर यशनं तिला प्रश्न विचारला, ‘तुझ्यासाठी प्रेमाची व्याख्या काय आहे?’ यशच्या प्रश्नाचं उत्तर देताना नुसरत म्हणाली, ‘एकमेकांसोबत राहणं नेहमीच आनंददायी असतं. पण असं करणं नेहमीच सोपं नसतं. प्रेम ही सर्वात कठीण गोष्ट आहे. पण तरीही प्रेम असेल तर तुम्ही कोणत्याही गोष्टीचा सामना करू शकता.’

“त्यावेळी माझे नाव माझ्या भावाशीही जोडले गेले”, रवीना टंडनने सांगितला ‘तो’ कटु अनुभव

दरम्यान नुसरत जहाँ आणि यश दासगुप्ता यांनी एकमेकांशी लग्न केलंय की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवरून तर त्या दोघांनी लग्न केलं आहे असं दिसून येतं. काही दिवसांपूर्वी नुसरतनं इन्स्टाग्रामवर एक केकचा फोटो शेअर केला होता. ज्यावर ‘पती आणि वडील’ असं लिहिलं होतं. याशिवाय तिचा मुलगा इशानच्या जन्म प्रमाणपत्रावरही यशचं नाव आहे. तिच्या डिलिव्हरीच्या वेळीही यश तिच्यासोबत राहून तिची काळजी घेताना दिसला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nusrat jahan reveals in radio show that how her and yash das gupta relationship was on the verge of collapsing nrp