तृणमूल काँग्रेसची खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहाँ नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तिने निखिल जैन या उद्योगपतीशी लग्न केले होते. गेल्या वर्षी नुसरत त्याच्यापासून वेगळी झाली. तेव्हा तिने ‘आमचे लग्न भारतीय कायद्यानुसार झाले नसल्यामुळे त्याला घटस्फोट देण्याचा प्रश्नच येत नाही’ असे म्हटले होते. ती सध्या यश दासगुप्ताला डेट करत आहे. नुसरतच्या फिल्मी करिअरपेक्षा खासगी आयुष्याबद्दल नेहमी चर्चा होत असते.
नुसरत सोशल मीडियावर फार सक्रिय आहे. तिने पोस्ट केलेले फोटो आणि व्हिडीओ खूप व्हायरल होत असतात. काल यश दासगुप्ताचा वाढदिवस होता. या निमित्ताने नुसरतने त्याच्यासह एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. या फोटोमध्ये दोघे एकमेकांकडे पाहत हसत आहेत. “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा यश. नेहमी आनंदी रहा. तुला खूप प्रेम” असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे. फोटोवरुन यश तिला एका हाताने मिठी मारत असल्याचे समजते. त्याने फोटोवर कमेंटदेखील केले होते. या पोस्टखाली त्यांच्या चाहत्यांनी कमेंट करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
आणखी वाचा – चाहत्याला फोटो देत असताना सारा अली खानच्या डोळ्यात आले अश्रू, व्हिडीओ व्हायरल
याच काळात तिने एका बाळाला जन्म दिला. तिच्या बाळाचे वडील कोण आहेत या मुद्द्यावरुन ती पुन्हा एकदा चर्चेत आली होती. एका चॅट शोमध्ये तिने या विषयावर भाष्य केले होते. बाळाबद्दल बोलताना ती म्हणाली होती, “मी एकटी आई नाहीये. माझ्या मुलाकडे, इशानकडे आई-वडील आहेत. मी माझ्या बाळाला जन्म देऊन कोणतीही चूक केली नसून हा माझ्या आयुष्यातला एक चांगला निर्णय आहे.”
आणखी वाचा – “तुषार कपूरशी माझं नाव जोडलं गेलं, तेव्हा…”; राधिका आपटेने केला खुलासा
नुसरतप्रमाणे तो देखील राजकारणामध्ये कार्यरत आहे. त्याने २०२१ मध्ये भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवली होती. त्याच्या विरोधात असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार स्वाती खंडोकर यांनी त्याचा पराभव केला होता. २००९ मध्ये यशने मनोरंजन क्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात केली. त्याने काही चित्रपटांमध्येही काम केले आहे.