कलाविश्व आणि चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणून ऑस्कर ओळखला जातो. चित्रपटातील दिग्गजांपासून ते अगदी बालकलाकारांपर्यंत सर्वांच्याच मनात या पुरस्कारासाठी एक विशेष स्थान असते. सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणाऱ्या ९५ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला पुरस्कार मिळालाच पण मलेशियन अभिनेत्री मिशेल योह हिला उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.

ऑस्करच्या ९५ वर्षाच्या इतिहासात मिशेल योह ही पहिली आशियातील अभिनेत्री आहे जिने उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला आहे. या अभिनेत्रीने मागे एका मुलाखतीमध्ये बॉलिवूडच्या एका अभिनेत्याबद्दल भाष्य केलं होतं. तो अभिनेता म्हणजे आमिर खान. ती असं म्हणाली “मी आमिर खानबरोबर कधीच काम केलं नाही. आम्ही दोघेही एका एनजीओचे ब्रँड अॅम्बेसेडर आहोत ज्याचं नाव आहे लिव्ह टू लव्ह, पर्यावरण वाचविण्याविषयी एनजीओ काम करतो.”

Kiran Mane
“डोळ्यात पाणी आलं…”, किरण माने यांनी सांगितली ‘ती’ आठवण; म्हणाले, “माझ्यासारख्या मराठी अभिनेत्याला…”
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
prasad oak baburav paintar biopic
प्रसाद ओक करणार प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाला, “ही भूमिका साकारायला मिळणं हा श्री…”
Who is Sadhvi Harsha Richariya
Who is Beautiful Sadhvi: महाकुंभमध्ये साध्वी म्हणून मिरवणारी हर्षा रिचारिया कोण आहे? जुने रिल व्हायरल करुन केलं जातंय ट्रोल
Monika Dabade
डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात अभिनेत्री झाली भावुक; ‘ठरलं तर मग’च्या टीमबद्दल म्हणाली, “आतापर्यंत हे माझ्यादेखत…”
shradhha kapoor boyfriend
श्रद्धा कपूरच्या मोबाईल वॉलपेपरवरील ‘ती’ व्यक्ती कोण? व्हायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण
Masaba Gupta baby girl name is Matara
३ महिन्यांची झाली लेक, बॉलीवूड अभिनेत्रीने नाव केलं जाहीर; ‘मतारा’चा अर्थ काय? वाचा…
tharla tar mag asmita aka monika dabade baby shower ceremony first look
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीचं पार पडलं डोहाळेजेवण, अस्मिता खऱ्या आयुष्यात आई होणार, समोर आला पहिला फोटो

आमिरबरोबर केलेल्या ‘त्या’ चित्रपटाची आजही राणी मुखर्जीला आहे खंत; करण जोहरचा उल्लेख करत म्हणाली, “माझा आवाज…”

ती पुढे म्हणाली, “मी त्याची मोठी चाहती आहे. तो एक अविश्वसनीय अभिनेताच नव्हे तर मोठ्या मनाचा माणूस आहे. मला आशा आहे की मला लवकरच त्याच्याबरोबर काम करण्याची संधी मिळेल.” आमिरचं कौतुक करताना ती पुढे म्हणाली, “मी आमिरचा एक चित्रपट पाहिला आहे. तो चित्रपट म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून ‘३ इडियट्स’ होता. ज्याची चर्चा जगभरात झाली होती.”

त्याने आजपर्यंत…” ‘तू झुटी मै मक्कार’ च्या दिग्दर्शकाने रणबीर कपूरविषयी केलं भाष्य; मानधनाचा ही केला उल्लेख

आमिर खानने आजवर अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्याच्या ‘दंगल’ चित्रपटाची चर्चा मोठ्या प्रमाणावर झाली होती. विशेषतः चीनमध्ये आमिर खानचे असंख्य चाहते आहेत. मागच्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालला नाही. सध्या आमिरने चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतला आहे.

Story img Loader