सप्टेंबर २०२४ मध्ये अनेक मोठे चित्रपट प्रदर्शित झाले. आता ऑक्टोबर महिन्यात मराठीसह बॉलीवूड आणि हॉलीवूडचे अनेक बहुप्रतीक्षित चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. या महिन्याच्या शेवटी दिवाळी असल्याने अनेक सिनेमे सण आणि सुट्ट्यांचा फायदा घेत प्रेक्षकांना सिनेमागृहात खेचून आणण्याचा प्रयत्न करतात. प्रेक्षकही या काळात नव्या सिनेमांची आतुरतेने वाट पाहतात. या महिन्यात अ‍ॅक्शन, थ्रिलर, कॉमेडी आणि ड्रामा यांसारख्या चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे. या महिन्यात कोणते सिनेमे कधी प्रदर्शित होणार आहेत, ते जाणून घेऊया.

जिगरा

वासन बाला दिग्दर्शित या चित्रपटात आलिया भट्ट आणि वेदांग रैना यांच्या प्रमुख भूमिका आहेत. परदेशात एका खोट्या गुन्ह्यात अडकलेल्या आपल्या भावाला सोडवण्यासाठी एक बहीण काय काय करते, हे या सिनेमात दाखवण्यात आले आहे. चित्रपटात जबरदस्त अ‍ॅक्शन आणि फायटिंग सीन्स आहेत. आलिया यात सत्याच्या भूमिकेत आहे, ती आपल्या भावाला वाचवण्यासाठी जी धडपड करते ती या सिनेमात मांडण्यात आली आहे. हा चित्रपट ११ ऑक्टोबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

ott new release Freedom at Midnight - SonyLIV Deadpool & Wolverine
या वीकेंडला ओटीटीवर पाहा थिएटरमध्ये गाजलेला ‘हा’ सिनेमा; सोबतीला आहे ऐतिहासिक वेब सीरिजसह थ्रिलरची मेजवानी
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Earnings of the sequel Singham Again and Bhool Bhulaiyaa 3 mumbai
दोन ‘सिक्वेल’च्या घवघवीत यशाने चित्रपटसृष्टीची दिवाळी गोड
adventure tourism in india
सफरनामा : साहसी पर्यटन!
maharashtrachi hasyajatra fame prasad khandekar reached in Nepal for movie shooting
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता प्रसाद खांडेकरचा येणार नवा चित्रपट, चित्रीकरणासाठी पोहोचला ‘या’ देशात
Actor Makarand Anaspure Directed movie rajkaran gela mishit marathi movie roles
दिवाळीनंतर मकरंद अनासपुरेंचा नवरंगी धमाका
Director Nikhil Advani believes that artistic films will never disappear
‘कलात्मक चित्रपट कधीच लोप पावणार नाहीत…’; दिग्दर्शक निखिल अडवाणी
new ott release november
थिएटरमध्ये गाजलेले ‘हे’ सिनेमे OTT वर होणार प्रदर्शित, काही याच वीकेंडला पाहता येणार, वाचा यादी

हेही वाचा…रणवीर सिंह ‘या’ भूमिकेसाठी माझ्यासमोर बसला होता तीन तास, शक्तिमान फेम अभिनेत्याच वक्तव्य; म्हणाला “त्याच्या चेहर्‍यावर…”

पाणी

आदिनाथ कोठारे दिग्दर्शित ‘पाणी’ चित्रपट १८ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट मराठवाड्यातील जलदूत हनुमंत केंद्रे यांनी दुष्काळी भागात पाण्यासाठी केलेल्या कामावर आधारित आहे.

वेट्टैयन

रजनीकांत यांच्या बहुप्रतीक्षित ‘वेट्टैयन’ चित्रपटाचे दिग्दर्शन टीजे ज्ञानवेल यांनी केले आहे आणि हा सिनेमा १० ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. हा रजनीकांत यांचा १७० वा चित्रपट आहे. चित्रपटात अमिताभ बच्चन, फहाद फासिल, राणा डग्गुबत्ती, रितिका सिंग, मंजू वारियर आणि दुशारा विजय यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाला ‘कोलावरी डी’फेम अनिरुद्ध रविचंदर यांनी संगीत दिले आहे.

हेही वाचा…Video : शाहरुख खान आणि विकी कौशलचा ‘ऊ अंटावा’ गाण्यावर डान्स; समांथा रुथ प्रभू व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “मी स्वप्नातही…”

जोकर : फोलिए अ ड्यूक्स

लेडी गागा आणि जोक्विन फिनिक्स यांचा ‘जोकर : फोलिए अ ड्यूक्स’ हा सायकोलॉजिकल थ्रिलर प्रकारातील चित्रपट २ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. टॉड फिलिप्स यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जोकर’चा सिक्वल आहे. जोकर सिनेमा यशस्वी ठरला होता. या सिक्वलमध्ये गायिका लेडी गागा हार्ले क्विनची भूमिका साकारणार आहे, तर जोक्विन फिनिक्स जोकरच्या भूमिकेत दिसणार आहे. २०१९ मध्ये आलेल्या ‘जोकर’ चित्रपटासाठी जोक्विन फिनिक्सला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला होता.

विकी विद्या का वोह वाला व्हिडीओ

राजकुमार राव आणि तृप्ती डिमरी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात १९९० च्या दशकातील कालखंड दाखवण्यात आला आहे. हा एक विनोदी सिनेमा आहे. ‘विकी विद्या का वोह वाला व्हिडीओ’ आलिया भट्टच्या ‘जिगरा’बरोबर ११ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा…Video : ‘ॲनिमल’साठी सर्वोत्कृष्ट खलनायकाचा पुरस्कार मिळाला अन् बॉबी देओलने पत्नीला केलं किस, व्हिडीओ व्हायरल

रामायण : द लेजंड ऑफ प्रिन्स राम

१९९३ मध्ये प्रदर्शित झालेला जपानी-भारतीय ॲनिमे चित्रपट हिंदी, तामिळ, आणि तेलुगू भाषांमध्ये डब करून ४K फॉर्मॅटमध्ये भारतात १८ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. १९९३ मध्ये भारतात हा सिनेमा काही वादांमुळे प्रदर्शित होऊ शकला नाही. पुढे हा सिनेमा कार्टून नेटवर्कवर दाखवला गेला. आता हा सिनेमा पुन्हा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.