कलाविश्वासोबतच राजकीयदृष्ट्याही ज्या चित्रपटावर अनेकांच्या नजरा खिळल्या आहेत तो म्हणजे ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’चा ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे. ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर या सिनेमामध्ये मनमोहन सिंग यांची व्यक्तीरेखा साकारली आहे. काही काळासाठी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे माध्यम सल्लागार असणाऱ्या संजय बारू लिखित ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर- मेकिंग अँड अमेकिंग ऑफ मनमोहन सिंग’ या पुस्तकावर या बहुचर्चित चित्रपटाचं कथानक आधारित आहे. सिनेमामध्ये बारु यांची भूमिका अक्षय खन्नाने साकारली आहे. सोनिया गांधींची भूमिका जर्मन अभिनेत्री सुझान बर्नेट यांनी तर राहुल गांधींची भूमिका अर्जुन माथूर तर प्रियांका गांधीची भूमिका आहाना कुम्रा यांनी साकारली आहे.

‘मनमोहन सिंह यांची भूमिका साकारणं माझ्यासाठी एक प्रकारचं आव्हानच आहे. ते अशा काळात भारतीय राजकारणात सक्रिय होते, ज्यावेळी माध्यमांची सक्रियता प्रचंड वाढली होती. त्यांच्या व्यक्तीमत्वाविषयी अनेकांना, संपूर्ण जगाला बऱ्याच गोष्टी माहित होत्या. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून मी त्यांच्या व्यक्तिरेखेविषयी बराच अभ्यास केला. आता त्याचा फायदा मी चित्रपटासाठी करुन घेण्याचा नक्कीच प्रयत्न करेन’, असं मनमोहन सिंग यांची भूमिका साकारण्यासंदर्भात अनुपम खैर एका मुलाखतीमध्ये म्हणाले होते.

नक्की वाचा >> अरेच्चा…! ही अभिनेत्री तर हुबेहूब सोनिया गांधी यांच्यासारखी बोलतेय

नक्की वाचा >>> ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ फेम अभिनेत्री साकारणार प्रियांका गांधींची भूमिका

विजय रत्नाकर गुट्टे यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली असून चित्रपटाच्या पटकथा लेखनाची जबाबदारी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते दिग्दर्शक हंसल मेहता यांनी घेतली आहे. हा सिनेमा ११ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Story img Loader